⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एनसीआरटी, सीबीएसई व विविध राज्यांची शिक्षण मंडळे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित Online labs

एनसीआरटी, सीबीएसई व विविध राज्यांची शिक्षण मंडळे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन लॅब्ज Online labs based on the syllabus of NCRT, CBSE and various state education boards

एनसीआरटी, सीबीएसई व विविध राज्यांची शिक्षण मंडळे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन लॅब्ज
Online labs based on the syllabus of NCRT, CBSE and various state education boards

इंटरनेटच्या माध्यमातून, अधिक चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चात विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील (प्रयोग शिकवले जाऊ शकतात) शिक्षण दिले जाऊ शकते या संकल्पनेवर ऑनलाईन लॅब्ज हा उपक्रम आधारित आहे. तसेच, प्रयोगशाळा आणि उपकरणांचा आभाव असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रयोगशाळेचा फायदा घेत येईल. यामुळे प्रयोगशाळांचा अभाव असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी इतर सुसज्ज शाळेतील विद्यार्थ्यांशी बरोबरीची स्पर्धा करू शकतील. प्रयोगशाळांमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना प्रयोगांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पण ऑनलाईन लॅब्जच्या माध्यामतून सगळे प्रयोग कोणत्याही वेळी आणि कुठेही केले जाऊ शकतात.

  • वैशिष्ट्ये-
    • एनसीआरटी, सीबीएसई व विविध राज्यांची शिक्षण मंडळे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित.
    • फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे वर्ग ९ ते १२ चे प्रयोग व इंग्रजी आणि गणिताचे वर्ग ९ व १० चे पाठ
    • इंटरऍक्टीव्ह प्रात्यक्षिके, अनिमेशन आणि व्हिडीओ
    • प्रयोगाची संकल्पना आणि सखोल आकलनासाठी सुविधा
    • कुठेही आणि कधीही प्रयोग करण्याची, परिणाम नोंदवण्याची आणि त्यातून शिकण्याची प्रत्येकासाठी व्यवस्था

ऑनलाईन लॅब्जची 'लर्निंग-ईनेबल्ड असेसमेंट'विविध पैलूंच्या मूल्यांकनांमध्ये मदत करते जसे, प्रयोगाची पद्धत आणि कुशल हाताळणी, संकल्पना आणि प्रयोगाचे आकलन व प्रयोगाच्या परिणामाची नोंद आणि निष्कर्षासंबंधित कौशल्य.

ऑनलाईन लॅब्जच्या निर्मिती मध्ये विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील अनेक जटील फंक्शन्सच्या प्रदर्शनासाठी गणितीय तंत्रांचा अभ्यास आणि उपयोग यांचा समावेश आहे. वास्तविक भासणाऱ्या विविध प्रयोगशाळा बनवण्यासाठी अद्यावत असे सिम्यूलेशन तंत्रज्ञान वापरलेलं आहे. सगळ्या प्रायोगिक पद्धती व्यास्थित समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधनही केले गेलेलं आहे. प्रयोगाच्या पद्धती आणि उपकरणे या बद्दलची इत्यंभूत माहिती विविध प्रयोगशाळांना भेटी देऊन तसेच प्रत्यक्षिकांना हजेरी लाऊन आत्मसात केली गेलेली आहे. वास्तववादी स्थितींच्या आधारावर चित्रमय प्रतीकांचे व्हिज्वलायजेशन आणि निर्मिती केली गेलेली आहे तसेच त्यांची संबंधित वास्तविक उपकरणांशी तुलनाही केली गेलेली आहे. विविध संलेखन (ऑथरिंग) साधनांचा उपयोग करून सिमुलेशन्सना इंटरऍक्टीव्ह बनवले गेले आहे. या प्रकारे वास्तविक प्रयोगशाळेच्या वातावरणाची पुनर्निर्मिती आणि सिमुलेशन केले गेले आहे.

ऑनलाईन लॅब्ज www.olabs.edu.in.येथे होस्ट केल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या लॅब्ज शाळांसाठी रजिस्ट्रेशन केल्यास नि:शुल्क उपलब्ध आहेत.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम