⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

५० नवे फिचर्स - गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘एनिवेअर स्कूल’

 

५० नवे फिचर्स - गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं एनिवेअर स्कूल
The Anywhere School With Over 50 New Features

The Anywhere School With Over 50 New Features  : गुगलने लाँच केलं एनिवेअर स्कूल’; ५० विविध फिचर्स. गुगलने विद्यार्थ्यांसाठी आणले आहेत ५० नवे फिचर्स

Google the anywhere school: सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक नवं पाऊल उचललं आहे. द एनीवेअर स्कूलनावाचा नवा उपक्रम गुगलने लाँच केला आहे. यात मीट, क्लासरुम, जी सुईट आणि अन्य प्रोडक्टसह ५० नवे फिचर्स आणले आहेत. जगभरातील २५० देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

सप्टेंबर महिन्यात, गुगल मीट या गुगलच्या अॅपवर तब्बल ४९ लोक दिसतील असे बदल करण्यात येणार आहेत. कंपनीने मंगळवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, लवकरच आणखी नवी वैशिष्ट्ये गुगल विद्यार्थी-शिक्षकांसाठी आणणार आहे. मॉडरेटर नेहमी पहिल्यांदा जॉइन होऊ शकेल आणि मीटींग बंद करू शकेल अशी व्यवस्था, इन-मिटींग चॅट डिसेबल होणे या आणि अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात गुगल मीट चा बॅकग्राउंड ब्लर करण्याची सुविधा देणार आहे. गुगलच्या शिक्षण विभागच्या उपाध्यक्ष अवनी शाह म्हणाल्या, ‘ब्रेकआऊट रुम्स, अटेंडन्स ट्रॅकिंगसारखे अनेक फिचर गुगल विद्यार्थी-शिक्षकांसाठी लाँच करणार आहे.येत्या वर्षअखेर कंपनी हँड रेझिंग, प्रश्नोत्तरे, पोलिंगसारखे फिचर आणणार आहे. तसेच टेम्पररी रेकॉर्डिंगसारखं फिचर सर्व एज्युकेशन कस्टमर्सना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

जगभरात गुगल क्लासरुम ही वेब सर्विस शाळा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. विद्यार्थ्यांना फायदेशीर होईल असे टू-डू विजेट ऑन क्लासेस पेजगुगल आणणार आहे. शिक्षक आता विद्यार्थ्यांना क्लासमध्ये इन्वाइट करण्यासाठी लिंक शेअर करू शकतात. क्लासरुम आता आणखी दहा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, यानंतर एकूण भाषांची संख्या ५४ वर जाणार आहे.

-MT

Tag-the anywhere school google,the anywhere school google event,the anywhere school 2020,the anywhere school 2020 google,the anywhere school 2020 google,the anywhere school google event,the anywhere school,the anywhere school 2020,the anywhere school 2020 google,the anywhere school google event

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • Sunil Pawar
    Sunil Pawar १५ ऑगस्ट, २०२० रोजी १०:०६ PM

    Nice information

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम