Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१

SHARE:

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 pdf पितृत्व रजा नियम 1955 अर्जित रजा अर्ज नमुना pdf अर्जित रजा शासन

महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ Maharashtra Civil Service (Leave) Rules 1981,महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 pdf पितृत्व रजा नियम 1955 अर्जित रजा अर्ज नमुना pdf अर्जित रजा शासन

महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
Maharashtra Civil Service (Leave) Rules 1981 

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना राज्‍य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्‍वारा जाहीर केलेल्‍या सण व इतर सुट्‍ट्‍या वगळून प्रतीवर्ष महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्‍वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्‍य झाल्‍यावर रजा उपभोगता येते.

 सुट्‍टी: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२३) अन्‍वये,

  • (१) परक्राम्‍य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्‍वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेली सुट्‍टी.
  • (२) शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्‍वारा, शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्‍याचा दिलेला आदेश याला सुट्‍टी असे संबोधण्‍यात येते.
  •  रजा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) अन्‍वये, सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.
  •  रजेचा हक्‍क: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १० अन्‍वये,
  • (१) सक्षम प्राधिकार्‍याने कामावर अनुपस्‍थित राहण्‍यास दिलेली परवानगी म्‍हणजे रजा.
  • (२) हक्‍क म्‍हणून रजा मागता येत नाही.
  • (३) रजा मंजूर करण्‍यास सक्षम अधिकारी, लोकसेवेच्‍या निकडीमुळे, कोणत्‍याही प्रकारची रजा नाकारू शकतो किंवा रद्‍द करू शकतो. शासकीय कर्मचार्‍यास लेखी विनंती खेरीज, देय असलेल्‍या आणि मागितलेल्‍या रजेचा प्रकार बदलता येणार नाही. 
  •  अखंडीत रजेची कमाल मर्यादा: महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण ३, नियम १६ अन्‍वये, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. रजेच्‍या कालावधीत सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी शिवाय दुसरी नोकरी किंवा व्‍यवसाय करता येत नाही.
  •  महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम ४० अन्‍वये राजपत्रित अधिकार्‍यांना शासकीय वैद्‍यकीय अधिकार्‍याच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. अराजपत्रित अधिकारी/कर्मर्‍यांना नोंदणीकृत वैद्‍यकीय व्‍यवसायीच्‍या वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे वैद्‍यकीय कारणास्‍तव रजा मंजूर करता येते. नियम ४७ अन्‍वये वैद्‍यकीय रजा संपल्‍यानंतर स्‍वास्‍थ प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.
  •  महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, नियम २७ व २९, परिशिष्‍ठ-१, अ.क्र. ५ अन्‍वये अराजपत्रित कर्मचार्‍यांच्‍या विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारच्‍या रजा मंजूर करण्‍याचे अधिकार नियुक्‍ती प्राधिकार्‍यांना आहेत.
  • उपजिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी (निवड श्रेणी), तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्‍यांना विशेष विकलांगता रजा आणि अध्‍ययन रजा या व्‍यतिरिक्‍त, १८० दिवसांपेक्षा जास्‍त कालावधीच्‍या रजा (सतत पाच वर्षे कमाल मर्यादेस आधिन राहून) मंजूर करण्‍याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्‍तांना प्रदान करण्‍यात आले आहेत.
  •  विना परवाना रजेवर जाणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल तसेच रजा संपल्‍यानंतर स्‍वेच्‍छेने गैरहजर राहणारा शासकीय अधिकारी/कर्मचारी शिस्‍तभंग कारवाईस पात्र ठरेल. (नियम ४८)
  •  शासनाच्‍या एका सेवेचा राजीनामा देऊन दुसर्‍या शासकीय सेवेत रूजु झाल्‍यास, राजीनाम्‍याच्‍या दिवशी शिल्‍लक असलेली रजा नवीन सेवेत हिशोबात घेण्‍यात येते. (नियम २२)
  • रजा वेतन: रजेवर जाण्‍याच्‍या दिवशी ज्‍या दराने वेतन मिळत होते त्‍याच दराने रजावेतन मिळते. रजा काळात वेतन वाढ मिळते परंतु त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्‍यावर मिळतो. 

शीर्षक डाऊनलोड लिंक
शीर्षकमहत्वाचे शासन निर्णय डाऊनलोड लिंकडाऊनलोड
शीर्षकरजा नियम PPT(1) डाऊनलोड लिंकडाऊनलोड
शीर्षकरजा नियम PPT(2) डाऊनलोड लिंकडाऊनलोड
शीर्षकNext Update डाऊनलोड लिंकडाऊनलोड


कोणती रजा किती दिवस 


रजेचे नाव आणि नियम :- किती दिवस:- शेरा :-
रजेचे नाव आणि नियम :-अर्जित रजा (पूर्ण पगारी) (Earned Leave) (नियम ५०) किती दिवस:-३०० दिवस (एका वेळी सलग १८० दिवस) शेरा :-प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी प्रत्‍येकी १५ दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात अर्जित रजा आगाऊ जमा होते. एकूण कामाचे दिवस गुणीले १/११= येणारे दिवस. (३०० दिवसापर्यंत रजा खात्‍यात जमा करुन ठेवता येते.)
रजेचे नाव आणि नियम :-अर्ध वेतनी रजा (Half pay Leave) (नियम ६०) किती दिवस:-सेवेच्‍या पूर्ण केलेल्‍या प्रत्‍येक वर्षासाठी २० दिवस शेरा :-प्रत्‍येक कॅलेंडर वर्षाच्‍या जानेवारी आणि जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी, प्रत्‍येकी १० दिवस या प्रमाणे वर्षात दोन हप्‍त्‍यात आगाऊ जमा होते. यात निलंबन काळ धरू नये. ही रजा कोणत्‍याही कारणासाठी घेता येते. याच्‍या साठवणुकीवर मर्यादा नाही. याकाळात ५०% दराने वेतन मिळते.
रजेचे नाव आणि नियम :-परिवर्तीत रजा (Commuted Leave) (नियम ६१) किती दिवस:-देय असलेल्‍या अर्ध वेतनी रजेच्‍या निम्‍मे दिवस शेरा :-देय अर्धपगारी रजा दुप्‍पट खर्ची टाकुन परिवर्तीत रजा मिळते. कमाल ९० दिवस. (एकूण उपभोगलेली रजा ही अर्ध वेतनी रजेच्‍या दुप्‍पट दिवस खर्ची पडेल) कर्मचारी कामावर परत न आल्‍यास या रजेचे रूपांतर अर्धवेतनी रजेत करून अतिप्रदानाची रक्‍कम वसूल करण्‍यात येते.
रजेचे नाव आणि नियम :-अनिर्जित रजा (Leave not due) (नियम ६२) किती दिवस:-अर्जित रजा, अर्धवेतनी रजा शिल्‍लक नसल्‍यास ही रजा मंजूर करण्‍यात येते. वैद्‍यकीय प्रमाणपत्र असल्‍यास, जेवढी अर्ध वेतनी रजा अर्जित होण्‍याची शक्‍यता असेल तितके दिवस शेरा :-एकूण सेवेत कमाल ३६० दिवस. एका वेळेस ९० दिवस. संपूर्ण सेवा काळात कमाल १८० दिवस. अर्धवेतनी रजेतून ही रजा कपात करण्‍यास येते. ही रजा कायम कर्मचार्‍यांसाठीच अनुज्ञेय.
रजेचे नाव आणि नियम :-असाधारण रजा (Extraordinary Leave) (नियम ६३) किती दिवस:-तीन वर्ष सतत सेवा पूर्ण – ६ महिने. पाच वर्ष सतत सेवा पूर्ण – १२ महिने. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या प्रमाणपत्रावर मानसिक आजार, कर्करोग ई. साठी – १८ महिने. शेरा :-रजा खात्‍यावर कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर किंवा विनंती वरुन. वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक. अस्‍थाई कर्मचारी:- वैद्‍यकीय प्रमाणपत्राशिवाय- ३ महिन्‍यापर्यंत एक वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- ६ महिन्‍यापर्यंत पाच वर्षाच्‍या सेवेनंतर-वैद्‍यकीय प्रमाणपत्राच्‍या आधारे- १२ महिन्‍यापर्यंत
रजेचे नाव आणि नियम :-परिविक्षाधीन कर्मचार्‍यास रजा (Leave on Probation) (नियम ६४) किती दिवस:--- शेरा :-अनुज्ञेय रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल. त्‍यापेक्षा जास्‍त रजा घेतल्‍यास परिविक्षाधिन काळात वाढ केली जाईल.
रजेचे नाव आणि नियम :-निवृत्तीपूर्व रजा (Leave to Preparatory to Retirement) (नियम ६६) किती दिवस:-सलग १८० दिवस किंवा एकूण सेवा कालात कमाल २४ महिने. शेरा :-नियत सेवा निवृत्तीच्‍या तारखेपलिकडे जाणार नाही ही दक्षता घेऊन १८० दिवस.
रजेचे नाव आणि नियम :-प्रसूती रजा (Maternity Leave) (नियम ७४) किती दिवस:-१८० दिवस पगारी रजा शेरा :-शासकीय सेवेत असणार्‍या महिला कर्मचार्‍यास, (नव्‍याने रूजु झालेल्‍यांसह) दोनपेक्षा कमी मुले हयात असतील तर अर्जाच्‍या तारखेपासून २६ आठवडे. किमान सेवेची अट रद्‍द करण्‍यात आली आहे.
रजेचे नाव आणि नियम :-गर्भपात रजा (नियम ७४(५) किती दिवस:-वैद्‍यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक. शेरा :-सहा आठवड्‍यापेक्षा जास्‍त होणार नाही इतकी रजा.
रजेचे नाव आणि नियम :-विशेष रजा (Special leave) किती दिवस:-सरोगसी पध्‍दतीने जन्‍मलेल्‍या आपत्त्‍याचे संगोपन करण्‍यासाठी महिला कर्मचार्‍यास आपत्त्‍याच्‍या जन्‍म दिनांकापासून - १८० दिवस शेरा :-संपूर्ण सेवा कालात एकदाच अनुज्ञेय आहे. अशा महिला कर्मचार्‍यास आपत्‍य नसावे तसेच तिने मुल दत्तक घेतलेले नसावे.
रजेचे नाव आणि नियम :-अपघाती/विशेष विकलांगता रजा (Special Disability leave for Accidental Injury) (नियम ७५ व ७६) किती दिवस:-पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय शेरा :-¨अपघाती रजा २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल. ¨विशेष विकलांगता रजा १२० दिवसांपेक्षा अधिक नाही, इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
रजेचे नाव आणि नियम :-रुग्‍णालयीन रजा (Hospital Leave) (नियम ७७) किती दिवस:-पदाची कर्तव्‍ये पार पाडतांना अनुज्ञेय शेरा :-२८ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही इतकी रजा मिळण्‍याचा हक्‍क असेल.
रजेचे नाव आणि नियम :-क्षय रोग/कर्क रोग/कुष्‍ठ रोग/ पक्षघात/एड्‌स रजा (T.B./Cancer/Leprosy/ Paralysis/Aids Leave) (नियम ७९) किती दिवस:-रोजंदारी व अंशकालीय कर्मचारी वगळून शेरा :-तीन वर्ष सेवेनंतर सवलती अनुज्ञेय १२ ते २४ महिन्‍यांपेक्षा अधिक नाही
रजेचे नाव आणि नियम :-अध्‍ययन रजा (Study Leave) (नियम ८०) किती दिवस:-लोकसेवेची निकड, कर्तव्‍य क्षेत्राशी संबंधीत उच्‍च-शिक्षणासाठी, पाच वर्ष सेवेनंतर अनुज्ञेय शेरा :-संपूर्ण सेवा कालात १२ ते २४ महिने. नंतर किमान तीन वर्षे सेवा बंधनकारक.
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-पिसाळलेला कुत्रा अथवा तत्‍सम जनावराने चावा घेतल्‍यास. शेरा :-२१ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-स्‍वत: नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-एकदा केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-६ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-कर्मचार्‍यास ४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीच्‍या बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-स्‍त्री कर्मचार्‍याने बाळंतपणाव्‍यतिरिक्‍त अन्‍य वेळी संतती नियमनाची शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-स्‍त्री कर्मचार्‍यास १४ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष रजा (बाल संगोपन रजा) (Special Leave) (Child care) किती दिवस:-महिला कर्मचारी, पत्‍नी नसलेले पुरूष कर्मचारी यांच्‍यासाठी शेरा :-१८ वर्षेपेक्षा कमी वयाच्‍या ज्‍येष्‍ठ मुलाच्‍या संगोपनासाठी, कमाल १८० दिवस (एका वर्षामध्‍ये दोन महिन्‍याच्‍या कमाल मर्यादेत) शासकीय सेवेत एक वर्ष पूर्ण झाल्‍यावर अनुज्ञेय
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-कर्मचार्‍याने स्‍वेच्‍छेने विनामूल्‍य रक्‍तदान केल्‍यास शेरा :-कर्मचार्‍यास १ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (एका वर्षात कमाल १० दिवस) (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-राष्‍ट्रीय क्रिडा स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेरा :-कॅलेंडर वर्षात ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (क्रिडा अधिकार्‍याचा दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-विशेष नैमित्तिक रजा (Special Casual Leave) किती दिवस:-कर्मचार्‍याच्‍या पत्‍नीने बाळंतपणानंतर किंवा अन्‍य वेळी केलेली नसबंदी शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍यामुळे दुसर्‍यांदा नसबंदी शस्‍त्रक्रिया केल्‍यास शेरा :-कर्मचार्‍यास ७ दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते. (वैद्‍यकीय दाखला आवश्‍यक)
रजेचे नाव आणि नियम :-नैमित्तिक/किरकोळ रजा (Casual Leave) (अचानक, आपत्‍कालीन खाजगी कामासाठी रजा) किरकोळ रजा. अत्‍यंत निकड असतांना काढली जाते. किती दिवस:-१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय. साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सात दिवसा वाढविता येते. (किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये. शेरा :-किरकोळ रजा ही रजा समजली जात नाही. अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही. अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित वा अन्‍य प्रकारांच्‍या रजा घेता येत नाहीत. नैमित्तिक रजेच्‍या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार किंवा सार्वजनिक सुट्‍टी असली तर ती जोडून रजा घेता येते. (कमाल सात ते दहा दिवस) सेवापुस्‍तकात नोंद घेता येत नाही. स्‍वतंत्र नोंदवही ठेवावी.
रजेचे नाव आणि नियम :-मोबदला सुट्‍टी किती दिवस:-फक्‍त निम्‍नश्रेणी (वर्ग ४) कर्मचार्‍यांना अनुज्ञेय. जादा कामाचा आर्थिक मोबदला दिल्‍यास अनुज्ञेय नाही. शेरा :-सुट्‍टीत केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून देतात. एक कॅलेंडर वर्षात एकावेळी तीन पेक्षा जास्‍त साठवता येत नाही. पुढीलवर्षी उपयोगात आणता येत नाही.
रजेचे नाव आणि नियम :-विपश्‍यनेसाठी रजा किती दिवस:-शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते. शेरा :-तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळात सहा वेळा.
रजेचे नाव आणि नियम :-विकलांग आपत्‍य रजा किती दिवस:-विकलांग आपत्‍य असलेल्‍या महिला कर्मचार्‍यास आणि विकलांग आपत्‍य असून पत्‍नी नसलेल्‍या पुरूष कर्मचार्‍यास, संपुर्ण सेवेत ७३० दिवस अनुज्ञेय शेरा :-४०% पेक्षा जास्‍त अंधत्‍व, क्षीण दृष्‍टी, बरा न झालेला कुष्‍ठरोग, श्रवण शक्‍तीतील दोष, चलन-वलन विगलांगता, मतिमंदता, मानसिम आजार. पहिल्‍या हयात दोन आपत्‍यांसाठी. आपत्‍याच्‍या २२ वर्षे वयापर्यंत. एकाहून अधिक हप्‍त्‍यात- एका आर्थिक वर्षात कमाल तीन आठवडे
रजेचे नाव आणि नियम :-गिर्यारोहण मोहिम रजा किती दिवस:-एका आर्थिक वर्षात कमाल ३० दिवस शेरा :-भारतीय गिर्यारोहण फेडरेशन मान्‍यता प्राप्‍त किंवा भारतीय युथ होस्‍टेल संस्‍थेने आयोजित केलेली गिर्यारोहण मोहिम
रजेचे नाव आणि नियम :-महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (दत्तक रजा) (Adoption Leave) किती दिवस:--- शेरा :-दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक महिन्‍यापेक्षा कमी असेल तर- एक वर्ष ** दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय सहा महिनेपेक्षा जास्‍त परंतु सात महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -सहा महिने ** दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय नऊ महिनेपेक्षा जास्‍त परंतु दहा महिन्‍यापेक्षा कमी असेल तर -तीन महिने ** दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षाच्‍या आत असेल तर-१८० दिवस ** दत्तक घेण्‍याच्‍या दिनांकास दत्तक मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्‍त आणि तीन वर्षापर्यंत तर-९० दिवस. दत्तकाबाबत कायदेशीर कागदपत्रे आवश्‍यक आणि हयात आपत्‍ये दोनपेक्षा कमी असावीत.
रजेचे नाव आणि नियम :-खाजगी शाळेतील महिला कर्मचार्‍यांसाठी विशेष रजा (गर्भपात रजा) (Abortion Leave) किती दिवस:-संपूर्ण सेवाकाळात एकदा शेरा :-गर्भपात/गर्भस्‍त्राव/गर्भसमापन यासाठी- -४५ दिवस
रजेचे नाव आणि नियम :-Next Update किती दिवस:--- शेरा :---
रजेचे नाव आणि नियम :-Next Update किती दिवस:--- शेरा :---


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

Tag-महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf,महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 pdf,पितृत्व रजा नियम 1955,अर्जित रजा अर्ज नमुना pdf,अर्जित रजा शासन निर्णय,सक्तीची रजा म्हणजे काय,

प्रसूती रजा अर्ज नमुना pdf,वैद्यकीय रजा अर्ज नमुना

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,111,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,372,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,637,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,534,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,789,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 pdf पितृत्व रजा नियम 1955 अर्जित रजा अर्ज नमुना pdf अर्जित रजा शासन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglURbgN__eSwe2l_4KPPZo5KDFPyDGCvKZE9VVvVWDXRV6EvTgMc9D0Q91cKZ0RiCJ9npXcB0jX5bcwP-UMwrLxVj-xr7mjDR_xpOGtavnXdEjnmFBBHHFCjyHuuH9XzAySlYfDoq_5FU/s16000/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B7%25E0%25A5%258D_%25E0%25A4%259F%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE+%2528%25E0%25A4%25B0%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%2529+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25AE+%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AF%25E0%25A5%25AE%25E0%25A5%25A7.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglURbgN__eSwe2l_4KPPZo5KDFPyDGCvKZE9VVvVWDXRV6EvTgMc9D0Q91cKZ0RiCJ9npXcB0jX5bcwP-UMwrLxVj-xr7mjDR_xpOGtavnXdEjnmFBBHHFCjyHuuH9XzAySlYfDoq_5FU/s72-c/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B7%25E0%25A5%258D_%25E0%25A4%259F%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE+%2528%25E0%25A4%25B0%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE%2529+%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25AE+%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AF%25E0%25A5%25AE%25E0%25A5%25A7.webp
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2020/09/Maharashtra-Civil-Service-Leave-Rules-By-thakare-blog.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2020/09/Maharashtra-Civil-Service-Leave-Rules-By-thakare-blog.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS