प्रस्तावित केल्यानुसार बदल · २०२०-२१ च्या निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी एका शैक्षणिक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल.
शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव ,शिक्षक पद मंजुरीचे 'असे'
ठरले नवे निकष !
खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 15 असेल, खासगी अनुदानित प्राथमिक आणि उच्च प्राथमिक
शाळांची संख्या २० असेल तर खासगी अनुदानित माध्यमिक शाळांची संख्या २5 पेक्षा कमी असेल. शाळा तेथील स्थायी शिक्षकांसह एक ते पाच किलोमीटर
परिसरातील दुसऱ्या शाळेत समायोजित केल्या जाणार आहेत.याबाबतचा प्रस्ताव अप्पर
मुख्य सचिवांना पाठविण्यात आला आहे. या शाळा व्यवस्थापनास स्वयं अर्थसहाय्य आधारे
शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. आता यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा होईल व
याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल
सोलंकी यांनी दिली.
२०१५-16 मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व
मध्यम प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पदे
मंजूर केली जात आहेत. परंतु, मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या
अधिकाराअंतर्गत माध्यमिक शाळांमधील पाचव्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना आता एक
किलोमीटरच्या परिघात स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी प्राथमिक शाळांशी जोडले
जाईल. मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या पदांचे
निकष सारखेच राहतील. दरम्यान, 2021-22 पर्यंत नवीन निकषांची
अंमलबजावणी करण्यात येईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी, विधिमंडळ सदस्यांनी सरकारकडे सूचना, प्रश्न व उत्तरे मागितली असा संदर्भ या प्रस्तावाशी जोडला गेला. राज्यातील
शाळांविषयी माहिती संकलित केली गेली असून पुढील महिन्यात याबाबत निर्णय अपेक्षित
आहे. तथापि, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी या बदलाला
विरोध केल्याने सरकार काय निर्णय घेईल याकडे लक्ष लागले आहे.
प्रस्तावित केल्यानुसार बदल
- · २०२०-२१ च्या निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी एका शैक्षणिक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल.
- · एक वर्षाच्या मुदतनंतरही विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर 2021-22 च्या निश्चित मान्यतानुसार इतर शाळांमध्ये त्यांचे समायोजन केले जाईल.
- ·
पटसंख्या वाढविण्यासाठी कमी पटसंख्या असणाऱ्या
शाळांना २०२२-२3 पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते; समायोजित
शाळांना शासकीय अनुदान मिळणार नाही
- · मागील वर्षी हा संच मंजूर झाला नसल्यामुळे 2018-19 मधील संच मान्यतेनुसार मंजूर झालेल्या पदांचा विचार केला जाईल आणि सुधारित निकषांचा विचार केला जाईल.
- · 105 विद्यार्थ्यांनंतर प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे १ या प्रमाणे 6वी ते 8वीच्या एकूण विद्यार्थ्यांसंखेने शिक्षकांची मान्यता मिळेल .
'माध्यमिक' शिक्षकांच्या
नियुक्तीसाठी निकष
- ·
(5 वी ते 10 वी) : 1 ते 175 विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षक आणि त्यानंतर
प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
- ·
(8 वी ते 10 वी) : 105 विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक आणि त्यानंतर प्रती 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
- ·
(क्रीडा शिक्षक) : शाळेतील मंजूर शिक्षक
आठ ते 15 असल्यास एक, 32 ते 39 शिक्षकांमागे दोन पदे
- ·
(कला शिक्षक) : शाळांमधील मंजूर शिक्षक 16
ते 23 असतील तर एक, शिक्षक
32 ते 39 असल्यास दोन पदे
- ·
(कार्यानुभव शिक्षक) : शाळेतील मंजू
शिक्षक 24 ते 31 असल्यास एक पद,
शिक्षक 48 ते 55 असल्यास
दोन पदे
प्राथमिक व माध्यमिकशाळांमध्ये शिक्षक संख्येबद्दल संचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS