भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन‘शिक्षक दिन’म्हणून साजरा करण्यात येतो.‘शिक्षक’हा भावी पिढीचा शिल्पकार अस
तुम्ही होतात.. म्हणूनच आम्ही घडलो......अभियान
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५
सप्टेंबर रोजी जन्मदिन‘शिक्षक दिन’म्हणून
साजरा करण्यात येतो.‘शिक्षक’हा भावी
पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक
दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता
व्यक्त करण्याचा हा दिवस.
तुम्ही होतात.. म्हणूनच आम्ही घडलो.
अभियानांतर्गत तुमच्या शिक्षकांन विषयी तुमचे छोटेसे मनोगत (टाईप करून)व्यक्त करा. आम्हाला
तुमचे मनोगत संदेश च्या स्वरुपात आमच्या https://wa.me/+919922987007 या whats App link ला सेंड करा.
उदा.
तुमचा संदेश /मनोगत
तुमचे नाव
आम्ही तुमचे व्यक्त केलेले मनोगत आपला ठाकरे ब्लॉगवर प्रसिद्ध करू.
#ThankaTeacher
**********************************************************
तुम्ही होता म्हणून आम्ही घडलो !
शाळेतील शिस्त ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती. शिक्षक आपल्या मुलांप्रमाणे प्रत्येकाला शिकवण्याचा प्रयत्न करायचे, परिस्थितीची जाणीव करून दिल्याने प्रत्येकाला जाण होती. त्यामुळे प्रेरणा मिळायची, प्रत्येक शिक्षक तळमळीने शिकवायचे. खरच गुरुचे स्थान जीवनात खूप महत्वपूर्ण आहे.
संजय काळे
महात्मा बसवेश्वर विद्यालय, उमरगा ता. उमरगा जिल्हा उस्मानाबाद
गुरु माझा बाप गुरु माऊली
गुरूच माझे दैवत आणि गुरु सावली
पाय निसटता वाटेवरुनी आवर तुम्ही घातली
प्रत्येक वळणावरती आयुष्याच्या साथ आम्हां दिली
कधी केली आम्हां शिक्षा कधी लाविला लळा
कधी दिली आम्हां प्रेरणा फुलवूनी संस्कारांचा मळा
छत्रपतीही झुकले होते रामदासांपुढे
एकलव्यानेही ठेविला अंगठा द्रोणाचार्यांकडे
तुमच्याकडे मागणे आमुचे फक्त एवढे
वरदहस्त असावा सदैव एवढेही साकडे
ज्ञानरूपी अमृताचे भरविले तुम्ही घडे
विद्यार्थी जीवनात गिरविले नवविचारांचे धडे
ज्ञान देतो विद्यार्थी घडवितो तोच खरा विद्वान
अशा या गुरुजनांचा आम्हां सार्थ अभिमान
वचन देतो मनापासुन आज तुम्हाला एक
कुठेही गेलो तरी कधीही कुणाशीही ना हारु
ईश्वरचरणी एकचीही प्रार्थना
जन्मोजन्मी मिळावे मज आपणासारखेची गुरु.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शभेच्छुक :- तेजस आवारी
अध्यापक हमारे जीवन को संवारते हैं, हमें सफलता की ऊँचाइयों तक पहुँचाते हैं, पर खुद गुमनाम रहते हैं. आज उनके प्रति अपना आदर और आभार व्यक्त करने का दिन है. ज़रा सोचिए, अगर अध्यापक न होते तो किसी दूसरे प्रोफ़ेशन का अस्तित्व ही न होता. #शिक्षक_दिवस-अशरफ शेख राहणार डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
बालवयात अक्षरापासून सुरुवात करून वाक्याचा अर्थ समजावण्या इतपत समर्थ बनवणाऱ्या, गुरुजींपासून ते जीवनाचा सार व अर्थ सांगून आयुष्यात काय करावे याची दिशा दर्शविणाऱ्या व मार्गदर्शक म्हणून सतत पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या सरांपर्यंत, माझ्या सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक -श्री. गांगोडे एच. पी.
आज शिक्षक दिन आहे ,
आपल्याला शिकवणाऱ्या गुरूंचा हा दिवस आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला शिकवणारे ,आपल्याला एक चांगला नागरिक बनवणारे ,आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे शिकवणारे ,आपल्याला काही अडचण आल्यास ती सोडवण्यात मदत करणारे ,आणि भरपूर काही जे किती पण बोललं तरी थोडेच . असेच माझे सर्व शिक्षक आहेत ,जे मला सर्व गोष्टींत मदत करतात ,समजून सांगतात ,समजून घेतात
. पण आपण कधीच असा विचार करत नाही की ते आपल्याला शिकवता ते कशा साठी आणि कोणासाठी ,आपण ते शिकवतात त्याच्याकडे लक्ष देतो नाही ,काही मुले ते त्यांच्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष देतो नाही .अरे ते आपल्या भल्यासाठीच हे सगळ करतात . समजा आपण शिकून खूप मोठे साहेब किवा अधिकारी झालो तर त्यांना काही फायदा आहे का ,नाही ना पण त्यांना यातून एक अस समाधान मिळत की आपला विद्यार्थी आज इतका मोठा झाला याचा त्यांना खूप आनंद होतो .आणि त्यांना तर हेच हवय की आपला विद्यार्थी खूप मोठा व्हावा ,आपल नाव मोठं करावं बस त्यांची तर हीच इच्छा असते .आणि आपण ती जरूर पूर्ण केली पाहिजे .तरच आपल्या शिकण्याचे साध्य होईल .
मी तर एवढच म्हणेल की शिक्षकासारखा दुसरा महान गुरु नाही
जय हिंद,🚩
शिक्षक म्हणजे अथांग समुद्र ।
ज्ञानाचा ,पावित्र्याचा एक वंदनीय असा कोपरा ।
व्यक्तीच्या मनातला शिक्षक म्हणजे अपूर्णाला पूर्ण करणारा ।
जगण्यातून जीवन घडवणारा । तत्त्वातून मूल्य फुलवणारा ।
शब्द शब्दांनी ज्ञान वाढवणारा । व्यक्तीला अनुभव अनुभव ज्ञान आणि ज्ञानतून कृतिशील बनवणारा ।
आज शिक्षक दिनानिमित्त सर्व माझ्या वंदनीय गुरुजनांना वंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
शुभेच्छूक:रणजीत खारतोडे
शिक्षक दिन 5 सप्टेंबर .....
आमचे गुरू होते म्हणूनच आम्ही घडलो ....
आमचे शिक्षक म्हणजे ज्ञानाचा आदरणीय कोपरा असतात, आमचे जीवन घडविणारे, क्षमता वाढवणारे, आई-वडिलांच्या कष्टाचे महत्त्व समजून सांगणारे, आदर्श संस्कार करणारे, शिकविता शिकविता आम्हास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान असणारे ,शब्दांनी ज्ञान वाढवणारे ,तत्त्वातून मूल्य फुलविणारे ,शिकवणीतून जीवन घडविणारे क्षमता वाढविणारे असे आमचे शिक्षक होते म्हणूनच आम्ही घडलो .आज दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी त्यांना आमचे कोटी कोटी प्रणाम...
सौ .वालझाडे एस .आर.
You’ve taught me everything I know. Because of you I don’t think that studying is boring, because of you I feel packed with knowledge and wisdom. Being your student is truly a blessing. I’ve learned so much from you. You are, hands down, the best teacher and an amazing person. Thank you for everything you do for all of your students.
*Happy Teachers’ Day!*💐🙏🏻
Roshan Ramesh Kadam.☺️
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षकांमुळेच होतो.शिक्षक हे आपले गुरू असतात ते आपल्याला ज्ञान देतात आणि ते आपल्याला घ्यायचे असते.ते देत असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त महत्त्व आहे.ज्ञान आपली खूण निर्माण करते.त्या ज्ञानाचा प्रसार शिक्षकांमुळेच होतो.शिकवणे काही लुप्त झालेली कला नाहीये पण लुप्तप्राय झालेली परंपरा मात्र नक्कीच आहे.लहाणपणी शिक्षक आपले गुरू बनुन नाही तर आपल्या आई-वडील यांप्रमाणे वागत असतात.शिक्षक आपले गुरू असतात ते आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा मार्ग दाखवतात. अशा आई-वडीलांप्रमाणे शिक्षक गुरूवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
साहिल गणपत घोडे ता- संगमनेर
जिल्हा- अ.नगर जयहिंद आदिवासी आश्रम शाळा,कोळवाडे
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना..शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरुशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री.खांडेकर D K
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता, त्यांना..शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विकास जाधव
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अविनाश पगार
यह आपकी वजह से है कि मैं आज एक मजबूत और आत्मविश्वासी व्यक्ति हूं। शिक्षक दिवस की शुभकामनाएं!
शिक्षक बिन ज्ञान नहीं
ज्ञान बिन आत्मा नहीं
ध्यान, ज्ञान, धैर्य और कर्म
सब शिक्षक की ही देन हैं
हैप्पी टीचर्स डेप्रज्ञा पाटील
प्रिय टीचर,
मुझे पढ़ना-लिखना
सिखाने के लिए धन्यवाद
मुझे सही-गलत की पहचान
सिखाने के लिए धन्यवाद
मुझे बड़े सपने देखने और
आकाश को चूमने का
साहस देने के लिए धन्यवाद
मेरा मित्र, गुरु और प्रकाश
बनने के लिए धन्यवाद
हैप्पी टीचर्स डे!!-कल्याणी
प्रिय टीचर,
हमें शिक्षित करने के लिए आपने
जो कड़ी मेहनत और प्रयत्न किये हैं
हम उसके सदा आभारी रहेंगे.
मैं भाग्यशाली था कि मुझे
आप जैसा गुरु मिला.
शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं.-हीना शेख
आम्हाला ज्ञानाचा साठा दिला
आम्हाला भविष्यासाठी तयार झाले
त्या शिक्षकांचे आभार
आम्ही जे केले त्याबद्दल धन्यवाद
माझ्या आयुष्यात येणार्या प्रत्येक शिक्षकास सलाम
प्रवीण जोपळे
तुम्ही मला नेहमीच सर्वोत्तम दिले ....
तुमच्यामुळेच मी भविष्यासाठी प्रेरित झालो ....
आपली लक्ष्य पूर्ण करण्यास शिकवलात…
मला एक गुरू, मित्रासारखे वाटते...
शिस्त, प्रेम सर्वकाही मिळाले आहे….
आणि ती व्यक्ती तुम्ही आहात.सर ..................
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्री.अभिजित सूर्यवंशी
आज शिक्षक दिनी आम्ही आपल्याला सांगायचे आहे कि
आपण आम्हाला ज्या प्रकारे शिकवता ...
आमची काळजी घेता ...
आमच्यावर प्रेम करता…
आपण जगातील प्रथम क्रमांकाचे शिक्षक आहात.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
उज्ज्वला
आपण एक महान शिक्षक आणि मार्गदर्शक आहात.
मी आज जे आहे त्यात आपले मोठे योगदान आहे.
तुमच्या प्रेम आणि मार्गदर्शनाबद्दल मी नेहमीच आभारी आहे.
माझ्या बाजूने हा पुरस्कार जाहीर करतो की आपण जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहात.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
श्री.रवींद्र पवार
तुमने सिखाया
उंगली पकड़ कर हमें चलना;
तुमने बताया
कैसे गिरने के बाद संभलना;
तुम्हारी वजह से
आज हम पहुंचे इस मुक़ाम पे;
आज शिक्षक दिन पर करते हैं
आभार सलाम से।
शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं.
Was in the darkness of oblivion
Made an identity
From the sorrow of the world
Made unknown
He is pleased
Master gave me a good
Made a human being. -sachin chavan
'शिक्षक 'म्हणजे एक समुद्र ,
ज्ञानाचा,......पवित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......
शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा.....
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वढविणारा,
शिक्षक, जगण्यातुन जिवन घडवणारा,
शिक्षक तत्वातून मुल्ये फ़ुलवणारा.....
ध्येय दिसते, तिथे नेतो शिक्षक,
सत्य ते, शिकवतो, वदवून घेतो तो शिक्षक,
ज्ञानाची ओळख.... पुर्णत्व म्हणजे शिक्षक,
निस्वार्थ तळमळीने शिकवितो तो शिक्षक.....
शिक्षा एक नावडते अंग शिक्षकाचे,
त्यातून ही ध्येय असते ज्ञान देण्याचे,
शिक्षक अचरणातुन ही शिकवत असतो,
म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो......
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक......
-स्नेह इंगळे
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत . या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
मनुष्याच्या आयुष्यात त्याचा गुरू अर्थात शिक्षकाचे स्थान मोठं आहे. शिक्षक हा मनुष्याच्या आयुष्याला आकार देतो आणि त्या शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील बहुमूल्य योगदान लक्षात घेता जगभर 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, भारतात शिक्षक दिन हा दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
भारतात शिक्षक दिन हा थोर शिक्षणतज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पुढे जावून भारताचे दुसरे राष्ट्रपती बनलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
हम को सब सिखाता गुरु है,
एक अछा इंसान बनता गुरु है.
हम होते है उसर की तरह,
हम में काबिलियत का बीज लगता गुरु है.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
“गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।”
रु गोबिंद दोऊ खड़े, का के लागूं पाय।
बलिहारी गुरु आपणे, गोबिंद दियो मिलाय॥
गुरु कीजिए जानि के, पानी पीजै छानि ।
बिना विचारे गुरु करे, परे चौरासी खानि॥
सतगुरू की महिमा अनंत, अनंत किया उपकार।
लोचन अनंत उघाडिया, अनंत दिखावणहार॥
या सगळ्या गोष्टीतून शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. मनुष्य कितीही मोठा झाला तरी या दिवशी तो शाळेतील वा महाविद्यालयातील आपल्या आवडत्या शिक्षकांना शुभेच्छा देण्यास विसरत नाही.
आपल्या आयुष्यात आलेला प्रकाश
अशा गुरूंना मी सलाम करते.
ज्यांच्याकडे जमिनीपासून आकाशात वितरित करण्याची क्षमता आहे
अशा शिक्षकास मनापासून अभिवादन करते.
कु. सुजाता तुकाराम काळे .
नमस्कार
मी पी जी पब्लिक स्कुल ला 3री ला शिकत आहे. मला खूप चांगले टीचर मिळले आज माझा वर्गातून पहिला क्रमांक येतो तो त्यांचा दिलेल्या ज्ञानयातून म्हणून मी सैनिकांप्रमाणे टिचर ला सलाम करतो.
याचा महत्वाचा पाया केला बचपन स्कुल मधील टिचरानी म्हणून मी त्यांना ही सलाम करतो. जय हिंद!
माझे नाव -आराध्य संदीप भावसार नंदुरबार
COMMENTS