Training of Higher Secondary Teachers on Evaluation Plan and Other Matters of 12th Restructured Curriculum फॉर्म भरण्याचा कालावधी दि.०१ ते ०८ ऑक्टोबर
इ.१२ वी पुनर्र्चीत अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व इतर बाबी संदर्भात उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण
Training of Higher Secondary Teachers on Evaluation Plan and Other Matters of 12th Restructured Curriculum
- फॉर्म भरण्याचा कालावधी दि.०१ ते ०८ ऑक्टोबर २०२० त्यानंतर हि लिंक बंद होणार.
- उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांसाठी
Online नोंदणी करताना लागणारी प्राथमिक माहिती
- ·
Teacher Details-Last Name, First Name,Father /
Husband Name:
- ·
College Details -Index No,Udise No,College Name
- ·
Principal Details-Principal Name,Principal Mobile No,Principal
Email
- ·
Teaching Details-Faculty, विषय,
Experience,Mobile No,WhatsApp Mobile No,Email
- ·
Passport Size photo
- ·
Teacher Sign
Online नोंदणी लिंक - येथे करा.
बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा बोर्डाने जाहीर
Online नोंदणी आणि प्रशिक्षणासाठी काही सूचना
१) प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
करताना सर्व माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करावयाचा आहे. अपूर्ण फॉर्म स्विकारला
जाणार नाही.
२) प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी ते शिकवत असलेले मुख्य विषय व
त्या सोबतच इतर विषय शिकवत असल्यास ते क्रमाने नोंदवावेत. शिक्षक प्रत्यक्ष शिकवत
असेलेले जास्तीत जास्त ४ विषय प्रशिक्षणासाठी नोंदविता येतील. तथापि संबंधित
मुख्याध्यापक / प्राचार्यांनी सदर शिक्षक हे विषय शिकवत असल्याबाबत प्रमाणित करणे
आवश्यक आहे .
३) फॉर्म भरताना कोणतेही विरामचिन्ह वापरू नये.
४) आपल्या उच्चमाध्यमिक शाळेचा ‘संकेतांक’
व ’यु-डायस’ क्रमांक
टाकल्यावर आपण कार्यरत असलेल्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाची
मंडळाकडे संग्रहीत असेलेली माहिती आपोआप दर्शविण्यात येईल, ती
पुन्हा भरवायची आवश्यकता नाही.
५) माहिती देवनागरी लिपी-Unicode व इंग्रजीत भरता येईल.
६) प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी अलीकडच्या काळातील फोटो स्कॅन
करून JPEG व JPG फॉरमॅट मध्येच अपलोड
करावयाचा आहे. कागदावर सही करून ती स्कॅन करून अपलोड करवायची आहे.फोटो व सहीची
साइज जास्तीत जास्त २५६kb असावी. जास्त साइज असलेले फोटो
किंवा सही अपलोड होणार नाही.
७) प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी नोंदणी फॉर्म भरून सबमिट
केल्यानंतर प्रशिक्षणार्थीनी त्यांच्या प्राचार्यांच्या दिलेल्या मोबाइल
क्रमांकावर व ईमेल वर OTP जाईल, प्राचार्यांच्या
मोबाइल क्रमांकावर आलेला OTP टाकल्या नंतरच पूर्ण होईल व
प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होईल त्यांनाच प्रशिक्षणाची लिंक प्राप्त
होईल.
८) अपूर्ण भरलेला फॉर्म सबमिट होणार नाही, त्यामुळे
त्यांची नोंदणी होऊ शकणार नाही,याची नोंद घ्यावी.
९) प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सदर फॉर्मचा PART-B भरावयाचा आहे. तो भरून सबमिट केल्यावर ई-प्रमाणपत्र जनरेट होईल.त्याची
प्रिंट प्रशिक्षणार्थी यांना घेता येईल ,याची एक प्रत
प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आपल्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात कार्यालय
प्रमुखकडे जमा करवायची आहे.
१०) लिंक मर्यादित काळासाठी असल्याने विहित मुदतीत फॉर्म
भरावेत,मुदतीनंतर लिंक बंद होईल. प्रशिक्षणासाठी ची लिंक
पाठविताना कोणत्या माध्यमातून आपल्या विषयाचे प्रशिक्षण होईल ते कळवण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS