इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-१९ च्य
केंद्रीय सैनिक मंडळाच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात आवाहन
इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये
उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ
गुणपत्रिका, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक
क्षेत्रात बदल झाल्याने अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बरेच विद्यार्थी मूळ गुणपत्रिकेअभावी
केंद्रीय सैनिक बोर्डमार्फत मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी ऑनलाइन अर्ज करु शकले
नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मूळ गुणपत्रिकेच्या ऐवजी पुढील वर्गात
प्रमोट केल्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा/ संस्थेकडून प्राप्त करुन घेऊन केंद्रीय
सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या वेबपार्टलवर (www.ksb.gov.in) ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करावे. ऑनलाईन अर्ज दि. ३० नोव्हेंबर २०२०
पर्यंत स्वीकारले जातील.
**************************************************
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे
अवलंबित यांना कळविण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना
इयता १० वी व १२ वी मध्ये जास्तीत जास्त गुण (९० टक्के व त्यापुढे) मिळालेले आहेत
किंवा विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य केलेले आहेत. अशांनी विशेष गौरव पुरस्कार
पात्रतेनुसार एकरकमी रु. १० हजार व रु. २५ हजारासाठी आवश्यक कागदपत्रांसह (मूळ
गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय पातळीवरील
क्रीडा क्षेत्रातील प्रमाणपत्र असल्यास) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अर्ज करावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर विद्या वी.रत्नपारखी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS