विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपले मत कसे नोंदवावे(शिक्षक मतदार संघ निवडून)
विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपले मत
कसे नोंदवावे
शिक्षक मतदार संघ निवडून २०२०
HOW TO RECORD
VOTES AT ELECTIONS TO LEGISLATIVE COUNCIL
१)केवळ आणि केवळ मतपत्रिके सोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या
शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे.इतर कोणताही पेन ,पेन्सिल
,बॉल पेन चा वापर करण्यात येऊ नये.
२) तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर
"पसंतीक्रम नोंदवावा" या रकान्यात "१"हा अंक लिहून मत
नोंदवावे.
3)निवडणून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता
मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत तितके पसंतीक्रम आपण मत पत्रिकेवर नोंदवू शकतो.
4)आपले पुढील पसंती क्रम उर्वरित उमेद्वारासामोरील रकान्यात
२,3,4,इ प्रमाणे आपल्या पसंती प्रमाणे नोंदवू शकतात.
5) एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा
अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.
6)पसंतीक्रम हे केवळ १,२,3,इ अशा अंका मध्येच नोंदविण्यात यावेत.ते एक ,दोन,तीन,इ अशा शब्दामध्ये
नोंदवण्यात येवू नये
7)पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या
आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1,2,3,किंवा रोमन अंक स्वरुपात
जसे I ,II III किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३, या स्वरुपात नोंदवावे.
8)मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षर
,नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये तसेच मतपत्रिकेवर
अंगठ्याचा ठसा उमटवू नये .
9) मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना टिकमार्क ✔️ किंवा
क्रोसमार्क ✖️ अशी खूप करू नये अशी मतपत्रिका अवैध ठरेल.
10) आपली मतपत्रिका वैध ठरावी या करिता आपण पहिल्या पसंती
क्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे ,अन्य पसंतीक्रम
नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url