Important points made in SCERT's VC for starting school 23 नोव्हेंबर पासून 9-12 वी च्या शाळा सूरू होत आहेत. त्यापूर्वी सर्व संबंधित 9-12 वी च्

शाळा सुरु करण्यासाठी SCERT च्या
VC मध्ये झालेले महत्वाचे
मुद्देImportant points made in
SCERT's VC for starting school
- 1) 23 नोव्हेंबर पासून 9-12 वी च्या शाळा सूरू होत आहेत.
- 2) त्यापूर्वी सर्व संबंधित 9-12 वी च्या शिक्षकांची
व शिक्षकेतर कर्मचार्यांची RTPCR चाचणी अनिवार्यपणे
करून घ्यावी.चाचणी ही सरकारी लॅब/केंद्रात करावी.
- 3) एका वर्गात सोशल डिस्टंसिंगच्या नियोजनानूसार किती विद्यार्थी वर्गात बसवावेत याचे नियोजन मूख्याध्यापकांनी करावे.
- 4) पालकांचे संमतीपत्र विद्यार्थी उपस्थितीसाठी अनिवार्य आहे.
- 5) विद्यार्थ्यांना दिवसभरात कमीत कमीत दोन मास्क वापरण्यास सांगावे.
- 6) पाण्याची बॉटल स्वतंत्रपणे आणण्यास सांगावी,एकत्र
जेवण करू नये याची दक्षता घ्यावी.
- 7) हात धूण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी,साबण,बादली,हँडवॉश स्टेशन यांची उपलब्धता करावी.
- 8) 15-सप्टेंबर व 10 नोव्हेंबरच्या परिपत्रकांचे वाचन करून घ्यावे.
- 9) 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू करण्याचे आदेश संबंधित सर्व मूख्याध्यापकांना द्यावे.
- 10) निवासी शाळामध्ये एकाआड एक निवासाची व्यवस्था करावी.
- 11) शालेय स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करावी.
- 12) स्थानिक परिस्थीतीनूसार आवश्यक बदल करता येईल,कोरोना
होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल.
- 13) गर्भवती शिक्षिकांनी शक्यतो शाळेत येऊ नये.
- 14) कलाउत्सव अंतर्गत 9 कलाप्रकारात विद्यार्थ्यांचा
सहभाग घ्यावा,व कलासादरीकरणाचा विद्यार्थ्यांचा
व्हीडीयो पोस्ट करावा.
- 15) DDसह्याद्रीवर सकाळी 7.30
-ते 12.30 या कालावधीत ऑनलाईन तासिका सूरू आहेत त्याचा लाभ घ्यावा.
- 16) शासनाच्या स्वाध्याय या उपक्रमात 1%पेक्षा कमी
विद्यार्थ्यांचा सहभाग आहे,सहभाग वाढवावा.
- 17) इ 3-8वी साठी जियो चॅनेलवर अभ्यास सूरू आहे ,पालक,विद्यार्थ्यांना अवगत करावे.
- 18) शाळा किती सूरू झाल्या,विद्यार्थी
,किती उपस्थित आहेत,किती तपासण्या
पूर्ण झाल्या याचा विहीत नमूना दिला जाईल ती माहिती सादर करावी.
- 19) आधार अपडेट करून घ्यावे.
- 20) बालदिन सप्ताह उपक्रमासाठी जिल्ह्यास लॉग ईन उपलब्ध होत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला-उत्सव आयोजनाबाबत
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS