⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

भविष्य निर्वाह निधी खात्यांची माहिती सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध | GPF Slip Download

भविष्य निर्वाह निधी खात्यांची माहिती सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध

Information on provident fund accounts for the year 2019-20 is available on Sewarth website

  • महाराष्ट्र महालेखापाल (A&E)-१ कार्यालय, मुंबईतर्फे वर्ष २०१९-२० साठी भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खात्यातील जमा रकमेसंबंधी स्लीप लेखा व कोषागरे संचालनालय यांना पाठविण्यात आली असून सदर माहिती महाराष्ट्र शासनाच्या SEVAARTH या संकेतस्थळावर http://sevaarth.mahakosh.gov.in येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याची लिंक https://agmaha.cag.gov.in/ या AG कार्यालयाच्या संकेतस्थळावरही देण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र शासनाचे जीपीएफ खाते धारक आपल्या जीपीएफ खात्यासंबंधी वर्ष २०१९-२० या वर्षासाठीच्या स्लीप्स सदर संकेतस्थळावर पाहू शकतात किंवा डाऊनलोड आणि प्रिंट करू शकतात.
  • राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ११ जून २०२० च्या शासन निर्णय क्रमांक GPF-2019/Pr.Kr.61/Kr.24 अनुसार जीपीएफ विवरणपत्राची हार्ड कॉपी देण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
  • जर जीपीएफ खात्यासंबंधीच्या स्लीप मध्ये काही त्रुटी आढळल्यास उप महालेखापाल (निधी) किंवा महालेखापाल (A&E) यांच्याकडे संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांमार्फत निर्दशनास आणून देता येतील. जन्म तिथी किंवा बँकेत जमा/वजा केलेल्या रक्कम किंवा इतर तत्सम माहिती स्लीपवर मुद्रित करण्यात आली नसेल तर याची सूचना प्रधान महालेखापाल(A&E)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडे पडताळणी व सुधारित माहिती देण्यासाठी पाठवावी. त्याचप्रमाणे जीपीएफ खातेधारक अशा त्रुटीसंबंधी माहिती agaemaharashtra1@cag.gov.in या इमेल वर ही पाठवू शकतात.


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम