⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-२)

Teacher Constituency Election (Part-2) Instructions for registering the vote on the ballot paper Various situations arising in the voting process Voters immediately after receiving the ballot paper Cancellation of ballot 

शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-२)

शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. या लेखाचा भाग दुसरा प्रसिद्ध करण्यात येत आहे त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे.

मतपत्रिकेवर मत नोंदविण्याबाबत सूचना

मत नोंदविण्यासाठी मतदारास जांभळा स्केच पेन देवून मतदान कक्षात जाण्यास सांगेल. मतदान कक्षात मतदार ज्या उमेदवारास मत देऊ इच्छित असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनने फक्त एकाच अंकात पसंती क्रमांक दर्शवावा. पसंती क्रमांक फक्त अंकातच द्यावयाचा आहे. तसेच पसंतीचे अंक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील कोणत्याही एका भाषेतील अंकात नमूद करावयाचे आहे.  (उदा. रोमन-I, II, III, – मराठी 1, 2, 3, – इंग्रजी १, , ३). मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराच्‍या नावासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येणार नाही. मतदारास पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्‍या नावासमोर पसंतीचे आकडे लिहिलेल्या आकड्यापैकी एक अंक येईल.

मतपत्रिकेवर पसंती क्रमांक व्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये. मतदाराने मतपत्रिकेवर मतदान नोंदविल्यावर पूर्वीच्या घडीवर त्या मतपत्रिकेची घडी घालावी. त्यानंतर घडी केलेली मतपत्रिका मतदान कक्षातून बाहेर आणावी आणि मतपेटीत टाकावी. मतदार  ही घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकेल व स्केच पेन तेथेच ठेवेल. मतदाराने खऱ्या मतपत्रिकेशिवाय इतर कोणतीही वस्तू अथवा कागद मतपत्रिकेत टाकता कामा नये, यासाठी मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्ह व केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी दिसेल अशा रितीने घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकण्याची प्रत्येक मतदाराला वेळोवळी सूचना देईल. यासाठी प्रत्येक मतदार मतपेटीमध्ये घडी केलेली मतपत्रिका टाकताना दक्ष राहून लक्ष ठेवील. मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर मतदार मतदान केंद्रातून बाहेर जाण्यापूर्वी त्याच्या बोटावरील पक्क्या शाईची खूण स्पष्टपणे उमटली असल्याची तसेच बोटावरील शाई पुसली नसल्याची खात्री करेल.

 

मतदान केंद्राध्‍यक्ष चिन्हांकित फोटो मतदार यादी, सर्व नमुने व लिफाफे, (मतदान अधिकारी-१) चिन्हांकीत फोटो मतदार यादी, इंडेलीबल इंक बॉटल, मतदानाच्‍या आकडेवारीचा तक्ता, (मतदान अधिकारी-२)-मतपत्रिका, स्थळ प्रतिपासून मतपत्रिका वेगळे करण्याचे कटर,  (मतदान अधिकारी-३) जांभळ्या शाईचे पेन व ढकल पट्टी.

 

मतदान केंद्रात प्रवेशपात्र व्यक्ती – 1) मतदान अधिकारी 2) एकावेळी एक उमेदवार/ त्याचा निवडणूक प्रतिनिधी /एक मतदान प्रतिनिधी 3) आयोगाने परवानगी दिलेली व्यक्ती 4) निवडणूक कामावरील सरकारी सेवक 5) आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक 6) मत नोंदविण्यासाठी आलेले मतदार 7) मतदारासोबत येणारे बालक / मूल 8) दिव्यांग व नि:समर्थ मतदारासोबत येणारी स्थानिक व्यक्ती (मदतनीस/सहाय्यक) 9) मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रात अपवादात्मक परिस्थितीमध्ये  प्रवेश दिलेली व्यक्ती.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये उपस्थित प्रतिनिधींना व निवडणूक कर्तव्यावरील सर्व संबंधितांना गोपनियतेची तरतूद वाचून दाखविणे आवश्यक आहे. संबंधितांना त्यांच्‍या कर्तव्याची व गोपनियतेची पूर्ण जाणीव करून द्यावी. उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी म्हणून आमदार / खासदार किंवा मंत्री किंवा झेड प्‍लस सुरक्षा प्राप्त अशा व्यक्तींना  मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणार नाही. सुरक्षा प्राप्त मतदाराच्या सुरक्षा रक्षकालाही साध्या कपड्यामध्ये येवून त्याच्‍याकडील शस्त्र कपड्याखाली लपवून ठेवावे लागेल. सुरक्षा रक्षक मतदार नसेल तर त्याला मतदान केंद्राच्या खोलीच्या बाहेर थांबावे लागेल.

मतदान प्रतिनिधीकडे ओळखपत्र आणि त्यांचे नेमणुकीबाबत उमेदवार किंवा त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांनी सही केलेला फॉर्म नंबर 10 असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवारास प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान प्रतिनिधी व दोन बदली मतदान प्रतिनिधी नेमता येतील. तथापि, कोणत्याही वेळी उमेदवाराचा एकच प्रतिनिधी केंद्रात उपस्थित राहील. तथापि, एका वेळी एका उमेदवाराचा एकच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहील. मतदान प्रतिनिधींचे हालचाल रजिष्टरमध्ये त्यांच्या नोंदी घ्याव्यात. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रामधून बाहेर जाण्यास किंवा ते सोडण्यास परवानगी देता येणार नाही.

मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, बिनतारी संदेश यंत्र, रेकॉर्डर, कॅमेरा, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ. घेऊन जाण्यासाठी मुभा नाही. तसेच त्यांच्‍याकडील मतदार यादी बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असल्याचा विश्वास प्रतिनिधीमध्ये निर्माण करावा.

मतदान प्रक्रियेमध्‍ये उद्भवणाऱ्या विविध परिस्थिती –

 

  • ·        मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम ३९)
  • ·        मतपत्रिका रद्द करणे
  • ·        अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान (नियम – 40)
  • ·        प्रदत्त मतपत्रिका (TENDER VOTE)  (नियम ४२)
  • ·        आक्षेपित मते (CHALLANGED VOTE)(नियम ३६)
  • ·        मतदाराने मतपेटीमध्ये बनावट मतपत्रिका {Spurious Ballot Paper} टाकणे
  • ·        मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम-39)  

 

नियम ३८ अनुसार किंवा या नियमांच्या दुसऱ्या कोणत्याही तरतुदीनुसार ज्याला मतपत्रिका दिली आहे असा प्रत्येक मतदार, मतदान केंद्रावर मताची गुप्तता राखील आणि त्यासाठी यापुढे घालून दिलेली मतदान पद्धती अनुसरील.

 

मतपत्रिका मिळाल्यावर मतदार ताबडतोब

मतदान पटापैकी एका कक्षात जाईल.

तेथे मतपत्रिकेवर, त्याला ज्या उमेदवारास मत देण्याची इच्छा असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनने फक्त एकाच भाषेतील अंकात पसंती क्रमांक दर्शवील.

III. आपले मत गुप्त राखण्यासाठी मतपत्रिकेची घडी करील.

आवश्यक वाटल्यास मतदान केंद्राध्यक्षास मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्हाचा ठसा दाखवील.

घडी केलली मतपत्रिका मतपेटीत टाकील.

मतदान केंद्रातून निघून जाईल.

प्रत्येक मतदार गैरवाजवी विलंब न लावता मत देईल. दुसरा मतदार मतदान कक्षात असतांना कोणत्याही मतदारास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२) मध्ये घालून दिलेली पद्धत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल. त्या मतपत्रिकेच्या पाठीमागे रद्द केली-मतदान पध्दतीचा भंगअसे लिहून त्या खाली सही करेल.

 

मतपत्रिका रद्द करणे 

जर एखाद्या मतदाराने मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सही करण्यास नकार दिला तर त्याला मतपत्रिका देवू नये.

मतदार अंध/दिव्यांग/कुष्‍ठरोगी असल्यास व तो सही करण्यास असमर्थ असल्यास त्याच्या मदतनीसाचा मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर सही /अंगठा घेईल व प्रतिज्ञापत्र भरेल.

मतदार यादीतील क्रमांक लिहिलेल्या ज्या मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सहीसाठी नकार दिला तर तसे मतदान अधिकारी यांनी नमूद केले असेल, ती मतपत्रिका रद्द करण्यात  यावी आणि ती व तिच्‍या स्थळ प्रत दोन्हीवर पाठीमागे रद्द-सही करण्यास नकारअसा शेरा लिहून ती मतपत्रिका रद्द केलेल्या मतपत्रिकेसाठी असलेल्या लिफाफ्यात ठेवावी.

सदोष किंवा खराब झालेली मतपत्रिका देखील वरीलप्रमाणे कृती अनुसरुन त्यावर  “रद्द -सदोष मतपत्रिका”  असे लिहून ती मतपत्रिका रद्द मतपत्रिकेच्या लिफाफ्यात ठेवावी.

वरील दोन्ही प्रकारे रद्द केलेल्या मतपत्रिकांचा हिशोब मतपत्रिकांचा हिशोबनमुना -16 च्या बाब क्रमांक 4 (ब) मध्ये दर्शवावा. (नियम -41 )

मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२) मध्ये घालून दिलेली पद्धत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल. 

मतपत्रिका परत घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, त्याच्या मागच्या बाजूला रद्द केली -मतदान पध्दतीचा भंगअसे लिहिल आणि त्याखाली आपली सही करील. त्याचा हिशोब नमुना 16 च्या बाब क्रमांक 4 (अ) मध्ये लिहिल.  (नियम -39 )

 Tag-Instructions for registering the vote on the ballot paper,Various situations arising in the voting process,Voters immediately after receiving the ballot paper,Cancellation of ballot


शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-1)

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम