Classes V to VIII in the state will start from January 27 राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आ
27 जानेवारीपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार
राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू
करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. कोरोनाशी संबंधित सर्व खबरदारी घेऊन हे
वर्ग 27 जानेवारीपासून सुरू केले जातील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेत कोणताही दोष राहणार नाही असे आश्वासन
पालकांना दिले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, "27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी
देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR
टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत
प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू
शकते."
दरम्यान, मुंबईतील शाळा पुढील
आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने
प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील कोव्हिडची साथ नियंत्रणात असली
तरीही अन्य देशांमध्ये असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील परिस्थिती पाहता मुंबई
महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद
ठेवण्यात येतील, असं या पत्रकात म्हटलं आहे आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS