जेईई (मुख्य) 2021-2022 साठी इयत्ता 12वी मध्ये 75% गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता Citizenship in the Qualification Criteria of 75% of the...
जेईई (मुख्य) 2021-2022 साठी इयत्ता 12वी मध्ये 75% गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता
Citizenship in the Qualification Criteria of 75% of the Class 12th for JEE (Advanced)
आयआयटी जेईई (ऍडव्हान्स) साठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी ईयत्ता 12वी मध्ये किमान 75% गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.
राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए) द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी),भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIEST), शिबपूर (पश्चिम बंगाल) आणि इतर केंद्रीय अनुदानीत तांत्रिक संस्था (सीएफटीआय - आयआयटी वगळता) मध्ये विविध यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो.
आयआयटी / एनआयटी / आयआयआयटी आणि इतर सीएफटी अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे जेईई रँकवर आधारित आहेत. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळण्यास पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत किमान 75% गुण मिळाले पाहिजेत किंवा संबंधित मंडळांकडून घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेत अग्रणी 20 टक्क्यांमध्ये असले पाहिजेत. अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या परीक्षेतील पात्रता गुण 65% आहेत.
जेईई (ऍडव्हान्स) परीक्षेची तारीख जाहीर करताना, शिक्षणमंत्र्यांनी विद्यर्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी ईयत्ता 12वी मध्ये किमान 75% गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केल्याचे जाहीर केले आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS