⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ. ५,६,७,८ वर्ग सुरू करण्यासाठी २७ जानेवारीची पूर्वतयारी

 

इ. ५,,,८ वर्ग सुरू करण्यासाठी २७ जानेवारीची पूर्वतयारी

 Preparations on 27th January to start classes 5,6,7,8

  • ·        वर्ग निर्जंतुकीकरण करवून घेणे.
    • ·        (ग्रा.पं.तर्फे किंवा स्वतःऔषध आणून)
    • ·        {शासन निर्देशानुसार पुन्हाही वर्ग सँनिटायझ केल्या जातील.}
  • ·        दररोज शिक्षक,विद्यार्थी, कर्मचारी यांची ताप मोजण्यासाठी थर्मल गन खरेदी करणे.
  • ·        {समग्र अनुदानातून}
  • ·        ऑक्सिमीटर खरेदी करणे {समग्र अनुदानातून}...ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी
  • ·        मास्क मुलांना खरेदी करणे, सँनिटायझर खरेदी करणे.{समग्र अनुदानातून}
  • ·        हात धुण्यासाठी पाणी, नळ,साबण उपलब्ध ठेवणे
  • ·        स्वच्छता संकुल स्वच्छ ठेवणे,वापरात ठेवणे, निर्जंतुक ठेवणे.
  • ·        ,,,८वर्गांना विषय वा शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी RTPCR ही कोरोना चाचणी करवून घेणे, प्रमाणपत्र शाळेत ठेवणे.
  • ·        कुठल्याही परिस्थितीत शाळेत हजर शिक्षक व विद्यार्थी मास्क वापरतील.मास्क न वापरणाऱ्यांची गंभीर नोंद घेतली जाईल.
  • ·        शाळेत प्रत्येकी २ विद्यार्थ्यांमध्ये ६ फूट अंतर असेल. शिक्षक,विद्यार्थी अंतरही ६ फूट असेल. जमिनीवर /फरशीवर वर्तुळे/चौकोन काढून त्यामध्ये मुले बसतील. विद्यार्थी जागा दररोज एकच असेल. डेस्क वा बाकांवर झिगझ्याग पद्धतीने ६ फूट अंतर असेल.
  • ·        दररोज शिक्षक, विद्यार्थी यांची ताप व ऑक्सिजन मोजून नोंदी घ्याव्यात.
  • ·        परिपाठ होणार नाही.
  • ·        लघवी, पाणी  यासाठी सर्व वर्ग/ मुले यांना एकदाच सोडू नये.मुले एकत्र येणार नाहीत.
  • ·        शाळेत जेवणार नाहीत.
  • ·        स्वतःच्या वस्तू-वहीपेन, मास्क, पाणी बाटली-एकमेकांना देणार नाहीत.
  • ·        तोंडात,नाकात,डोळ्यांत बोट घालणार नाहीत.
  • ·        शाळा किमान३तास,कमाल ४ तास भरेल.
  • ·        {सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ योग्य असेल.}
  • ·        जास्त संख्या असणाऱ्या शाळेत ५०%आज व ५०%उद्या असे विद्यार्थी हजर राहतील.
  • ·        पालकांचे शाळेत पाठवण्यास तयार असल्याबाबत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही.
  • ·        मास्क शिवाय शाळेत कुणालाही प्रवेश नसेल.
  • ·        ऑनलाईन वर्ग चालूच राहतील. शाळेत गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर द्यावा. ऑनलाईन इतर विषय घ्यावेत.

संदर्भ दिनांक लिंक
संदर्भपरिपत्रक / GR दिनांक१५ जून २०२० लिंकडाऊनलोड
टप्याटप्याने शाळा सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना
संदर्भपरिपत्रक / GR दिनांक२९ ऑक्टोबर २०२० लिंकडाऊनलोड
शिक्षक-शिक्षकेतर उपस्थिती- मार्गदर्शक सूचना.
संदर्भपरिपत्रक / GR दिनांक१० नोव्हेंबर २०२० लिंकडाऊनलोड
शाळा सुरु, मार्गदर्शक सूचना -1

शासन निर्णय पहावेत.शाळेत ठेवावेत आणि पाळावेत.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम