⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ | Vision 2025 of school education department

शालेय शिक्षणासाठी रोड मॅपतयार करण्याचे निर्देश

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ | Vision 2025 of school education department

Vision 2025

राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावाअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ (Vision 2025 of school education department) असे सादरीकरण शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ | Vision 2025 of school education department

यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाडअपर मुख्य सचिव वंदना कृष्णाशिक्षण आयुक्त विशाल सोळंकीमहाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदीपरीक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेराज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करीत असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे. आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा  आणि त्यासाठी दरवर्षी  किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी.

राज्यातील शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये फेजवाईज इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुलांना सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबरच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का, या पद्धतीने शाळेची रचना करावी. यासाठी बोलक्या भिंती यासारखे उपक्रम राबवता येतील का हे सुध्दा पाहण्यात यावे.

शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजननुसार(Vision 2025 of school education department) काम करताना तातडीने हाती घ्यावयाची कामे आणि दीर्घकालीन कामे याचा प्राधान्यक्रम निश्चित करावातसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत शालेय विकासासाठी काय करता येईल आणि त्यांना शासनाबरोबर कसे जोडले जाईल यासाठी विभागाने प्रयत्न करावा असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ | Vision 2025 of school education department

गुणवत्तेकडे वाटचाल : शिक्षीत महाराष्ट्र समर्थ राष्ट्र

शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या कीशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे५ हजार आदर्श शाळांची निर्मिती करणेशिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ | Vision 2025 of school education department चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले.

  • ·        परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी
  • ·        शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे
  • ·        शासन निर्णय
  • ·        कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे
  • ·        गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली.

राज्याला विविध शैक्षणिक निर्देशकांमध्ये (PGI,SEQI,NAS etc.) सर्वोच्च स्थानावर नेण्याचे ध्येयआहे.परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सुधारण्यासाठी शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासननिर्णय कायदा फेरनिरीक्षण सुलभीकरण करणे, गुणवत्तेनुसार मुख्याध्यापक भरती अशा उपाययोजना करण्यात येतील.


राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर, फेजवाईज इंटरनेट सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता ह्या विषयांवर अधिक लक्ष देणे यांसारख्या अनेक सूचना मुख्यमंत्री महोदयांनी केल्या आहेत.



सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम