Ek Bharat Shreshtha Bharat (EBSB Club) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत एक भारत-श्रेष्ठ भारत योजनेबाबत नवीन म
एक भारत - श्रेष्ठ भारत योजना अंतर्गत शाळांमध्ये क्लब
स्थापना
Ek Bharat
Shreshtha Bharat (EBSB Club)
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण
मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत एक भारत-श्रेष्ठ भारत
योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या
विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे
प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट- चित्रपट, हस्तकला,
खेळ, सण-उत्सव, साहित्य,
चित्र-शिल्प या सर्वांमध्ये विविधतेचे दर्शन होत आहे.
यासाठी देशातील राज्या-राज्यांची जोडी करून राज्यांमधील
उपरोक्त नमुद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची
ओरिसा या राज्यात सोबत जोडी (Pairing) करण्यात आलेली
असून या शैक्षणिक वर्षात ओरिसा राज्याबाबतचे उपक्रम घ्यावयाचे आहेत. एक
भारत-श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये संदर्भीय
पत्रानुसार खालील उपक्रम घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.
- शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत क्लबची स्थापना राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ते १२ वीच्या शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत क्लब (EBSB Club) ची स्थापना करण्यात यावी. या क्लबमध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश करावा.
- एक भारत-श्रेष्ठ भारत या उपक्रमाअतर्गत पुढे नमूद यादीतील उपक्रम शाळांमध्ये माहे फेब्रुवारी व मार्च २०२१ या कालावधीत राबविण्यात यावेत.
- एक भारत-श्रेष्ठ भारत क्लबची स्थापना शालेय स्तरावर केल्यावर त्यावाबतची माहिती खालील लिंक वर भरावी.
Ek Bharat
Shreshtha Bharat (EBSB Club)
- यामध्ये क्लब मधील एकूण विद्यार्थी संख्या मुले व मुलींची संख्या व क्लवच्या घेतलेल्या बैठकांची संख्या इ.नमूद करावी.
- या क्लब मधील सदस्यांनी पुढाकार घेऊन शाळेतील इतर विद्यार्थ्याच्या मदतीने शाळांस्तरावर खाली दिलेले उपक्रम राबवावेत.
- उडीया भाषेतील १०० वाक्यांचा सराव: सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मधील उडीया भाषेतील वाक्यांचा शालेय वेळेत ५-१० मिनिटांचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात यावा.
परिपत्रक – डाऊनलोड
शाळांमध्ये घ्यावयाचे उपक्रम
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS