अविरत टप्पा १,२,३, मध्ये उत्तम पायाभरणी झाली असल्याने, अविरत ४ मध्ये काही प्रमुख विषय आपण हाताळायचे ठरवले होते. परंतु, सद्यस्थितीत, कोरोना प्रादुर्भा
“अविरत टप्पा ४ “ बद्दल
About "Avirata Phase 4"
शिक्षक
मित्र-मैत्रिणींनो,
आपण आम्हाला वारंवार 'अविरत टप्पा ४'
कधी सुरु होणार अशी फेसबुक, ई-मेल आणि
व्हाट्स-अँप द्वारे विचारणा करत आहात. अविरत च्या माध्यमातून आपले नाते खूप
जिव्हाळ्याचे झाले आहे आणि म्हणूनच आपल्या विचारणेबद्दल स्पष्टीकरण देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.साने गुरुजी हे एक
उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर अतिशय सहृदय शिक्षक म्हणून ओळखले जातात आणि
श्यामची आई फाऊंडेशन (SAF) या आमच्या संस्थेसाठी ते
आदर्श आहेत.
प्रत्येक शिक्षक, मग तो शहरी अथवा ग्रामीण
भागातील असो, अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अथक
परिश्रम करत असतो.सध्याच्या बदलत्या काळात, मुलांचे विश्व
तंत्रज्ञान व इतर सुविधांमुळे इतके झपाट्याने बदलत आहे की शिक्षक म्हणून मुलांना
समजून घेताना आणि घडवताना कधी कधी आपली प्रेरणा टिकून राहणे कठीण होते.
याच वाढत्या समस्येची जाणीव ठेवून, महाराष्ट्रातील
प्रत्येक शिक्षक हे किशोरवयीन विद्यार्थ्यांचे सहप्रवासी व सुलभक होण्याकरिता
तसेच शिक्षकांना सक्षम करण्यासाठी
महाराष्ट्र शासनाच्या “अविरत” ह्या ४
टप्प्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये आम्हांला सहभाग घेता आला हे आमचे भाग्य समजतो.
गेल्या ३ वर्षांपासून 'अविरत
ऑनलाईन प्रशिक्षणाने' जवळपास सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेतील १
मुख्याध्यापक व २ शिक्षक अश्या सुमारे ४० हजार शिक्षकांबरोबर ३ टप्प्यांचा अतिशय
सुंदर प्रवास पूर्ण केला. या शिक्षकांची शिकण्याची आवड आणि प्रतिसाद हा आमच्यासाठी
अत्यंत प्रेरक ठरला. अजून सखोल संशोधन (रिसर्च) करून उत्तम आशय आपल्यापर्यंत
पोहोचविण्याचा आमचा उत्साह वृद्धिंगत करत राहिला. अविरत मध्ये मांडलेल्या संकल्पना
या शिक्षकांनी अतिशय सक्षमपणे वर्गात अंमलात आणून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपयुक्त
उपक्रम राबवले याचे उत्कृष्ट दाखले सुद्धा वेळोवेळी या शिक्षकांनी आमच्या पर्यंत
पोहोचवले.
सध्या कोविड आणि त्या नंतरच्या कठीण काळात, जेव्हा
किशोरवयीन विद्यार्थी अनेक मानसिक व शैक्षणिक अडचणींना सामोरे जाणार आहेत. अशावेळी
आपण सर्व शिक्षक अतिशय योग्यपणे त्यांच्या समस्या हाताळू शकाल असा आमचा विश्वास
आहे.
अविरत टप्पा १,२,३,
मध्ये उत्तम पायाभरणी झाली असल्याने, अविरत ४
मध्ये काही प्रमुख विषय आपण हाताळायचे ठरवले होते.
परंतु, सद्यस्थितीत, कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व व्यवस्थेवर तसेच शासनावर देखील आलेल्या आर्थिक ताणामुळे निधी अभावी
शासनामार्फत होणारा 'अविरत टप्पा ४ आपण पूर्ण करू शकत नाही'
असे आम्हाला कळविण्यात आले आहे.ह्या गोष्टीचा आम्हांला अतिशय खेद
आहे व आम्ही शासनाला हे प्रशिक्षण शेवटच्या टप्प्यावर असताना आम्ही काय मदत करू
शकतो हे सुद्धा कळविलेले आहे.
आपण सर्व शिक्षकांनी मागील ३ वर्षांपासून घेतलेल्या कष्टाचे
आम्हांला भान आणि त्याबद्दल कृतज्ञता देखील आहे. आपण सर्वानी दिलेले सहकार्य व
आपली विद्यार्थ्यांसाठीची तळमळ हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक स्वयंसेवी
संस्थेसाठी हीच मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की शहरी तसेच अगदी दुर्गम आणि
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरुजनांसाठी देखील आम्ही काही तरी
अर्पण करू शकलो.
सध्या हा प्रवास इथेच थोड्या कालावधीसाठी थांबत आहे. मात्र
आम्हाला आशा आहे की 'आपल्या सर्वांबरोबर हा स्नेहाचा प्रवास
असाच “अविरत” सुरु राहील'.
आपल्या सर्वांच्या कार्याला अनेक सलाम व शुभेच्छा!
महाराष्ट्र शासन, MSCERT, DIET, मास्टर ट्रेनर्स, मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व सहप्रवासी यांना मनःपूर्वक धन्यवाद!!
पुन्हा लवकरच भेटू.
आपली
श्यामची आई फाऊंडेशन टीम
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS