Varsha Gaikwad's big announcement that 10th-12th exams will be held offline only कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune) कडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानुसार 12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत.
परीक्षा केंद्र
कोविड असल्याने यावर्षी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. थोडक्यात आपल्याच शाळेत मुलांना परीक्षा देता येईल. 15 पेक्षा अधिक परीक्षार्थी असलेल्या शाळांना उपकेंद्र मिळेल तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना जवळचे परीक्षा केंद्र मिळेल अशी माहितीही शिक्षण मंडळाने दिली आहे.
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगसाठी विद्यार्थ्यांना झिगझॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहे असंही शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
परीक्षेसाठी वाढीव वेळ
पेपर साडे दहा वाजता सुरू होईल. परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ मिळेल. 100 मार्कांसाठी 30 मिनिटांचा तर 40 मार्कांसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ मिळेल. यावर्षी आम्ही 15 दिवस उशिराने परीक्षा घेतोय त्यामुळे मुलांच्या मागणीनुसार आम्ही आधीच कालावधी वाढून दिला आहे.
COMMENTS