speech competition categories,how to win in speech competition,speech competition for students,speech competition for students 2021,speech competition
World Speech Day निमित्त राज्यस्तरीय
वक्तृत्व/ भाषण स्पर्धाState level oratory / speech competition on the occasion
of World Speech Day
जागतिक स्तरावर प्रदूषण यामुळे पर्यावरणामध्ये होणारे बदल व
त्यामुळे जीव सृष्टीवर होणारे परिणाम हा ही एक गंभीर विषय आहे. याचाच परिणाम
म्हणजे जागतिक तापमान वाढ,बदलणारे ऋतुचक्र ,ऱ्हास होत चाललेली जैवविविधता यासारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत
आहोत. आपले विद्यार्थी हे आपले भावी नागरिक आहेत . त्यांना या सर्व समस्यांना
सामोरे जावे लागणार आहे. यादृष्टीने जागतिक पर्यावरण बदल (Climate Change) या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपले विद्यार्थी,शिक्षक
व पर्यायाने पालक या सर्वांचे लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये
पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी व World Speech Day
(15 मार्च २०२१) च्या अनुषंगाने
विद्यार्थ्यांची भाषण / वक्तृत्व कला विकसित होण्यासाठी व राज्य पातळीवरील व्यासपीठ विद्यार्थ्यांना
उपलब्ध व्हावे याकरिता “पर्यावरण बदल ” (Climate
Change) या विषयावर आधारित इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांचे
वक्तृत्व / भाषणाचे व्हिडिओ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे यांचेकडून मागविण्यात येत आहेत.
सदर उपक्रमात भाग घेण्यासाठी खालील सूचनांचे पालन करण्यात यावे.
1. जागतिक भाषण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पर्यावरण बदल (Climate
Change) हा विषय देण्यात येत आहे.
2. राज्यातील इ.५ वी ते १० वी मध्ये अध्ययन करणारे सर्व माध्यमांच्या
शाळांमधील विद्यार्थी सदर व्हिडिओ तयार करून आपल्या पालकांच्या / शिक्षकांच्या
फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्टिटर अकाऊंट
वर पोस्ट करावेत. व्हिडिओ पोस्ट करत असताना विद्यार्थ्याचे नाव, शाळेचा UDISE क्रमांक, शाळेचे
नाव, तालुका, जिल्हा हि माहिती सोबत
असणे आवश्यक आहे व #climatechangemh या HASHTAG (#) चा वापर करावा.
3. अपलोड करावयाच्या व्हिडीओ चा कालावधी जास्तीत जास्त ३ ते ५ मिनिटे असावा.
4. दि. १३ मार्च २०२१ पर्यंत व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांमध्ये अपलोड
करण्यात यावेत.
5. विद्यार्थ्यांनी पर्यावरण बदल या विषयास अनुसरून उपविषय घेण्याचे
स्वातंत्र्य असेल. मात्र त्यात आपले मत/विचार व्हिडीओ च्या माध्यमातून मराठी/
हिंदी/ इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतून प्रभावीपणे सादर करावयाचे आहेत.
6. संबंधित उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले व्हिडीओ #climatechangemh
या HASHTAG (#) चा उपयोग करुन विविध समाजमाध्यमांवर (फेसबुक,
इंस्ट्राग्राम, व्टिटर) वरच अपलोड करावेत. सदर
पोस्ट पब्लिक( Public) असावी.
7. विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमांत भाग घेतल्यानंतर व्हिडीओ पोस्ट केल्यावर https://scertmaha.ac.in/climatechange या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सदर व्हिडीओ च्या पोस्ट ची लिंक टाकून उपक्रमात सहभाग अंतिम करावा.
8. प्राप्त सर्व व्हिडीओपैकी जिल्हानिहाय उत्कृष्ट ३ व्हिडीओंना यथायोग्य
सन्मानित करण्यात येईल.
सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमधील इ.५ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती पोहोचविण्यात यावी.जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी सदर उपक्रमामध्ये सहभाग घेवू शकतील.
Tag- speech
competition categories,how to win in speech competition,speech competition for
students,speech competition for students 2021,speech competition for students
2019,speech competition topics for students,speech competition for college
students,speech competition for school students,speech competition for ukg
students,speech competition rules for students
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
THANKS
उत्तर द्याहटवा