राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे दर्जेदार ई-साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महारा
गणित विषयाच्या मराठी माध्यमाकरिता ई-साहित्य निर्मिती करणेकरिता निवड
प्रक्रियाSelection process
for production of e-content for Marathi medium of Mathematics
राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांकरिता गणित
विषयाचे दर्जेदार ई-साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे
यांचे मार्फत ई-साहित्य निर्मिती करण्यात येणार आहे.याकरिता उत्कृष्ट व्हिडीओ
निर्मिती तज्ञ व भाषांतर तज्ञ यांची निवड करण्यात येणार आहे.लिंक भरण्यापूर्वी
खालील सूचनांचे लक्षपूर्वक वाचन करावे. त्यानंतर नोंदणी करावी.
व्हिडीओ निर्मिती तज्ञ
१. गणित विषय अध्यापनाचा अनुभव असणारे स्थानिक स्वराज्य संस्था
/शासकीय शाळेतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षक ,विषय सहाय्यक
/विषय साधन व्यक्ती नोंदणी करू शकतील.याकरिता गणित विषयाचे अतिरिक्त शिक्षकही
नोंदणी करू शकतात.
२.प्रस्तुत व्हिडीओ निर्मितीकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे या कार्यालयात स्टुडीओ तयार
करण्यात येत आहे.तरी व्हिडीओ निर्मिती करणेकरिता पुणे येथील कार्यालयात किमान १
वर्ष या कालावधीकरिता किंवा काम पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज
करावे लागेल.
३.याकरिता आपली नेमणूक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिनियुक्तीवर
नेमणूक असेल.कामपूर्ण झालेनंतर आपणास कार्यमुक्त करण्यात येईल.
४.या नेमणूक कालावधीतील आपले वेतन मूळ आस्थापनेवरून होईल.
५.या कामाकरिता कोणताही अतिरिक्त पूरक भत्ता किंवा मानधन अनुज्ञेय
असणार नाही.
६.दिलेल्या कालमर्यादेमध्ये कामकाज विहित निकषामध्ये पूर्ण करणे
बंधनकारक राहील.निकषानुसार कामकाज न झाल्यास आपणास कार्यमुक्त करण्यात येईल.
भाषांतर तज्ञ
१. गणित विषय अध्यापनाचा अनुभव असणारे स्थानिक स्वराज्य संस्था
/शासकीय शाळेतील तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील प्राथमिक/माध्यमिक शिक्षक ,क्षेत्रीय अधिकारी,विषय सहाय्यक ,विषय साधन व्यक्ती,अतिरिक्त शिक्षक,गणित विषयाचे निवृत्त शिक्षक,नोंदणी करू शकतात.
२. भाषांतर करावयाचे कामकाज हे ऑनलाईन स्वरुपात करावयाचे असल्याने
सदर कामकाज त्यांचे दैनंदिन शालेय कामकाज सांभाळून घरी काम करू शकतात.
३.सदर कामाकरिता कामाच्या स्वरूपानुसार मानधन देय असेल.
४.आपणास पुरविण्यात येणाऱ्या निकषानुसार विहित कालावधीमध्ये
भाषांतराचे काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
उपरोक्त बाबी मान्य असल्यास नोंदणीकरिता खालील लिंक भरावी.
परिपत्रक –डाउनलोड
हि लिंक दि.१५ मार्च २०२१ पर्यंत भरावी लागेल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS