इ ११ वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सूचना
इ ११ वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश
परीक्षा (CET) सूचना
Common Entrance Test (CET) Instructions for 11th
Admission
प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत (CET) खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे
इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Online सरावासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय :
- 1.
इ. ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी
सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या (राज्य मंडळ, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी)
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.
- 2. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.
- 3.
सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.
१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये
इंग्रजी,
गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर
प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न
पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice
Objective Type Questions) असेल. परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
- 4. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
- 5.
सामाईक प्रवेश परीक्षा, आयुक्त
शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा
केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषीत करण्यात येईल.
- 6.
इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश
परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने; इयत्ता
१० वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ/ परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर
विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल.
- 7.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इ. १०
वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. १०
परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश
परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही.तथापि, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व
आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी अन्य मंडळाच्या
विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून/परीक्षा परिषदेकडून
विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.
- 8. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान घोषीत होण्याची अपेक्षा आहे. सामाईक प्रवेश परीक्षा इयत्ता १० वीच्या निकालानंतर २ आठवड्यांमध्ये(सुमारे जुलै महिनाअखेर अथवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा) आयोजित करण्यात येईल.
सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी.
- · इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
- · इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
- ·
सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या
विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त
राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही
अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न
दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या
गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.
शासन निर्णय- डाऊनलोड
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url