राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत Bridge Course च्या ऑनलाईन उद्घाटन Online Inauguration of Bridge Course by State C
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
यांचेमार्फत Bridge Course च्या ऑनलाईन उद्घाटन
Online Inauguration of Bridge Course by State Council for Educational
Research and Training, Maharashtra, Pune
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
यांचेमार्फत निर्मित सेतू अभ्यासक्रम (Bridge Course)च्या ऑनलाईन उद्घाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता
राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या उद्बोधन कार्यक्रमास उपस्थित राहावे.
सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. -शाळा बंद,पण
शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण
सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच
विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी
येऊ शकतात.त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील
शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत सर्वच
विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
उद्घाटन
- · सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी
- · सकाळी.११.०० वाजता
शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख
व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्वाची
असून यादृष्टीने सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याच्या अनुषंगाने सेतू
अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
परिपत्रक - डाऊनलोड
तरी कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेवून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी सर्व तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता,विषय सहायक,विषय साधन व्यक्ती यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे.
सर्व इयत्तानानुसार ब्रिज कोर्स PDF
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE LINK
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS