वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी आता प्रशिक्षणाची अट राहिली नाही. पुढील अटींची पूर्तता करून वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी देण्याचे मान्य केले आहे.
वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी सुधारित तरतुदी
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी बाबत 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाची अमंलबजावणी करावी अशी मागणी सातत्याने शिक्षक भारतीने केली आहे. याबाबत आपण शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. आपल्या मागणीनुसार वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी आता प्रशिक्षणाची अट राहिली नसून केवळ गोपनीय अहवालावर दिले जावे अशी आपण मागणी केली होती ती मागणी मंजूर झाली आहे. त्यानुसार शिक्षण निरीक्षक कार्यालय, उत्तर विभाग, मुंबई यांनी पत्र जारी केले आहे.
वरिष्ठ व निवडश्रेणीप्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी आता प्रशिक्षणाची अट राहिली नाही. पुढील अटींची पूर्तता करून वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी देण्याचे मान्य केले आहे.
- 1) शासन निर्णय दि. 23.10.2017 पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीतील असलेल्या निकषांप्रमाणे वरीष्ठ व निवड श्रेणीकरीता पात्र शिक्षकांची यादी.
- 2) वैयक्तिक मान्यता.
- 3) मागील दोन वर्षाचे गोपनीय अहवाल समाधानकारक असल्याबाबत मुख्याध्यापकां चे प्रमाणपत्र.
- 4) संस्था ठराव.
असेच पत्र आपापल्या विभागात काढण्यासाठी शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, पाठपुरावा करावा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS