⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा फॉर्म भरण्यास २६ जुलैपासून सुरुवात

११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा फॉर्म भरण्यास पुन्हा सुरुवात

११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा फॉर्म भरण्यास पुन्हा सुरुवात  

विद्यार्थ्यांसाठी काही सूचना

  • ·        दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा पुन:श्च उपलब्ध.
  • ·        सदर सुविधा दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.
  • ·        मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी खालील माहिती नोंदवावी लागणार आहे.

  • ·        ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)
  • ·        पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्यावत करणे किंवा नव्याने नोंदणी अनिवार्य आहे.
  • ·        परीक्षेचे माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.
  • ·        सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग (WARD) निश्चित करावा लागेल.
  • ·        ज्या विद्यार्थ्यांनी इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा EWS हा प्रवर्ग निवडावा लागेल.

११ वी सामाईक प्रवेश परीक्षेच्या विषयाचे घटकनिहाय अभ्यासक्रम

वरील प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व त्यानंतर इ.११ वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची सुरुवात करावी.

  • ·        दि.२०.०७.२०२१ ते दि.२१.०७.२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशिल पूर्वीचा अर्ज क्रमांक (Application No.) व आवेदनपत्र भरतांना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल.
  • ·        या आधी सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • ·        मात्र प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांचा तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सराव

परिपत्रक - डाऊनलोड

CBSE, ICSE व अन्य मंडळांचे विद्यार्थी

  • ·        राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे.
  • ·        यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
  • ·        अशा विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दि. २८.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

·        याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम