राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आग्रहाला मान देत श्री.उद्धव ठाकरे,
पदभरती बंदीतून शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा
Clear the way for teacher recruitment through recruitment
ban
राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा
मार्ग मोकळा झाला आहे. मा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या
आग्रहाला मान देत श्री.उद्धव ठाकरे, श्री अजित पवार आणि श्री
बाळासाहेब थोरात यांनी ह्या भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून
वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतःअनुदानित व विनाअनुदानित,अनुदानास पात्र घोषित केलेल्या
प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक
पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरली
जातील.
सदर पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS