सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीपूर्वी विद्यार्थी अध्ययन स्थिती माहिती संकलन संदर्भातील मार्गदर्शक सूचना
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीपूर्वी
विद्यार्थी अध्ययन स्थिती माहिती संकलन संदर्भातील मार्गदर्शक सूचना
माहिती संकलन साधना विषयी :
. स्थिती सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीची विद्यार्थ्यांची अध्ययन तपासण्यासाठी इयत्ता 2 री ते 8 वी या इयत्तांचा विचार करण्यात आला आहे.
• SCERT, महाराष्ट्र यांचे मार्फत सेतू अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्धारित करण्यात आले आहेत.
. इयत्तानिहाय एक प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विषयावरील प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. (केवळ हिंदी विषय वगळण्यात आलेला आहे.) प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत.
• सदर प्रश्नपत्रिका सद्यस्थितीत सर्व्ह
मंकी लिंकच्या माध्यमातून online स्वरूपात https://www.research.net/r/bridgecourseprestudy
या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती संकलन प्रक्रिया :
1. प्रत्येक जिल्ह्यातील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता व विषय सहायक तसेच तालुका स्तरावरील विषय साधन व्यक्ती व केंद्र स्तरावरील केंद्रप्रमुख यांच्या मदतीने प्रस्तुत संशोधनासाठी माहिती संकलन करण्यात यावे. आपण सर्व अधिकारी व कर्मचारी हे शिक्षक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य करणारे असल्याने आपण सर्व विद्यार्थ्यांकडून सदर प्रश्नावली सहजतेने, तटस्थपणे भरून घेऊ शकाल असा विश्वास आहे.
2. प्रस्तुत संशोधनासाठी माहिती संकलन करताना प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी एकूण 40 विद्यार्थ्यांची माहिती संकलित करायची आहे. यामध्ये इयता 2 री व 3री मधील प्रत्येकी 5 विद्यार्थी, तर इयत्ता 4 थी ते 8 वी पर्यंतच्या प्रत्येक इयत्तेतील 6 विद्यार्थी यांची माहिती संकलित करायची आहे.
3. आपणासर्वांना कल्पना आहे की, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुविधा उपलब्ध
नाही. म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडे स्मार्ट फोन नाही. त्यामळे अशा
मुलांच्या अध्ययनाची स्थिती देखील या संशोधनातून कळणे आवश्यक आहे. याकरिता
प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांची माहिती
संकलित करताना.
(ज्या भौगोलिक क्षेत्रात (जसे आदिवासी
क्षेत्र) ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या तुलनेत ऑफलाईन विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक
आहे. अशा ठिकाणी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 50%- 50% घेण्यात यावे. किंवा प्रत्येक इयत्तेचे 2 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेणारे व उर्वरित ऑफलाईन शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा.)
4. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी
आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील
विद्यार्थ्यांचा समावेश माहिती संकलित करताना करावा. जेणेकरून विविध
व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व संशोधन नमुन्यामध्ये होऊ
शकेल.
5. माहिती संकलित करताना प्रत्येक
इयत्तेतील मुले व मुली यांचे समप्रमाण ठेवावे.
6. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना
एकूण 40 विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावयाची असल्याने दररोज 10 विद्यार्थी याप्रमाणे 4 दिवसात सदर
माहिती संकलित करणे शक्य आहे. सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीपूर्वी विद्यार्थी अध्ययन
स्थिती तपासणी करत असल्याने सदर माहिती लवकरात लवकर संकलित करणे आवश्यक आहे. आपण
आपल्या कार्यक्षेत्रातील सदर माहिती आपल्या गती नुसार दोन ते तीन दिवसात देखील
संकलित करू शकाल. मात्र चार दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी माहिती संकलित करण्यासाठी
घेण्यात येऊ नये. सदर लिंक 7 जुलैपर्यंत चालू
असणार आहे. यानंतर सदर लिंक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर
माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
7. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी
आपण ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे. त्यांची यादी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेकडे पुढील विहित
नमुन्यात जमा करावी व स्वत:कडे देखील जतन करून ठेवावी.
परिपत्रक –डाऊनलोड
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url