11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द
राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा
रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास
झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21
ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र,
हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा
निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई
हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ,
असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
इयत्ता अकरावीच्या
प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी (अकरावी सीईटी )उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली.
अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश
द्या, असे आदेश
उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हायकोर्टाने दिलेल्या या
निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मिळाला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू
ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसई बोर्डाच्या एका
विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली
होती.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS