Seminars on starting a school and guidance to teachers,शाळा सुरु होणेबाबत चर्चासत्र व शिक्षकांना मार्गदर्शन
शाळा सुरु होणेबाबत चर्चासत्र व शिक्षकांना मार्गदर्शन | Seminars on starting a school and guidance to teachers
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी
भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासनाने
अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार उपरोक्तप्रमाणे दि.४
ऑक्टोंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
दि.१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायं.४.०० वा. ऑनलाईन चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री,
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य याबाबत
मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मा.वंदना कृष्णा, अप्पर मुख्य
सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व टास्क फोर्समधील
मान्यवर अधिकारीही या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
तरी आपण स्वतः या चर्चा सत्रास उपस्थित राहावे. तसेच आपल्या
अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक
यांनाही उपस्थित दर्शवावी.
LIVE Seminar
COMMENTS