National Education Policy 2020 (NEP 2020) धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्य अभ्यास
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी तज्ञ व्यक्तींची मागणी
Demand for experts for formulation of state curriculum plan as per new national education policy
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक | National Education Policy 2020 (NEP 2020) धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येणार आहे. खाली जोडलेल्या यादीनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करतानाच २५ पोझिशन पेपर तयार करण्यात येणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया सर्वसमावेशक व राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्या समवेत तयार करण्यात येणार आहे.
- १. राज्य अभ्यासक्रम आराखडा-शालेय शिक्षण
- २. राज्य अभ्यासक्रम आराखडा- बालपणातील काळजी व शिक्षण
- ३. राज्य अभ्यासक्रम आराखडा- शिक्षक शिक्षण
- ४. राज्य अभ्यासक्रम आराखडा - प्रौढ शिक्षण
वरील प्रमाणे चार राज्य अभ्यासक्रम आराखडे व २५ पोझिशन पेपर
विकसित करण्यासठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील प्राचार्य, वरिष्ठ
अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अध्यापक
विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य, शिक्षणाधिकारी,
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ, केंद्रप्रमुख,
प्राथमिक / माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच
विद्यापीठातील प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य,
प्राध्यापक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील
प्राचार्य, प्राध्यापक, शासनाच्या
विविध विभागातील अधिकारी, अशासकीय संस्थांचे सदस्य या मधील
इच्छुक तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
सहभाग घेऊन योगदान देण्याची इच्छा व आवश्यक तज्ज्ञत्व
असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरावा.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७.०९.२०२१ 20.09.2021
कार्यक्षेत्रातील इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींना उपरोक्त लिंकवर
अचूक माहिती भरावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS