राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीचा तपशिल सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये शाळा लॉगिन वरुन अद
सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांच्या
आधार क्रमांकाची माहिती नोंद करणे आणि यापुर्वी नोंदविण्यात आलेल्या माहितीची
पडताळणी करणे
राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीचा तपशिल सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट
पोर्टलमध्ये शाळा लॉगिन वरुन अद्यावत करणे आवश्यक आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या
अधिपत्याखालील शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार
क्रमांकाची माहिती अद्यावत करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये शाळा लॉगिनवरुन
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अचूकरित्या नोंदविण्यात यावी.
सद्यस्थितीमध्ये राज्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती
नोंदविण्यात आलेली आहे. तरी आपल्या अधिनस्त शाळांमधील उर्वरित विद्यार्थ्यांच्या
आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थीनिहाय नोंदविण्यात यावी.
एकापेक्षा अधिक विद्यार्थ्याची माहिती एक्सल सिटद्वारे अद्यावत करण्यात येवू नये.
प्रलंबित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती स्टुडंट
पोर्टलमध्ये दि. २९/०९/२०२१ पर्यंत नोंदविण्यात येईल दक्षता घेण्यात यावी.
- सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत केलेल्या अधार क्रमांकाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकाने पुनश्च: पडताळणी करावी.
- शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्यांचे नाव, जन्म
तारिख व लिंग आणि स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे नमुद केलेले नाव, जन्म तारीख व लिंग हे आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत असल्याची
खात्री करावी आणि यामध्ये त्रुटी असल्यास आधार कार्डवरील माहिती दुरुस्त
करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी व दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार
क्रमांकाचा तपशिल स्टुडंट पोर्टलमध्ये अद्यावत करण्यात यावा.
- एकच आधार क्रमांक एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या समोर नमुद केला नसल्याची खात्री करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी.
- स्टुडंट पोर्टलमध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एका पेक्षा अधिक वेळा नमुद केले नसल्याची खात्री करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS