मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आयोजित लोकशाही दीपावली स्पर्धा २०२१ स्पर्धा - प्रवेश अर्ज (आकाशदिवा/आकाशकंदील व रांगोळी स्पर्धा)
लोकशाही दीपावली स्पर्धा २०२१ चा निकाल जाहीर
मुख्य निवडणूक अधिकारी
कार्यालयातर्फे २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत लोकशाही दीपावली
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कालावधीत भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त
पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याने मतदार जागृती करण्याच्या उद्देशाने सदर
स्पर्धेचा विषय लोकशाही,मताधिकार,
मतदार नोंदणी हा ठेवण्यात आला होता.
आकाशदिवा आणि रांगोळी या स्पर्धांसाठी महाराष्ट्रातील
विविध भागांतून एकूण ६८५ प्रवेशिका आल्या होत्या. त्यांपैकी आकाशकंदील स्पर्धेसाठी
२११, तर रांगोळी स्पर्धेसाठी
५२० स्पर्धक सहभागी झाले.
आकाशकंदील स्पर्धेच्या
परीक्षणाचे काम श्री. मयुरेश गद्रे आणि श्री. यशवंत जाधव यांनी पाहिले, तर रांगोळी परीक्षणाचे काम श्री. उमेश पांचाळ
आणि श्री. नितीन वारे यांनी पाहिले.
रांगोळी विभाग
- प्रथम -प्रशांत तुकाराम कुडकर (मुंबई)
- द्वितीय - संतोष अशोकराव पथक (परभणी)
- तृतीय - दिनेश जनार्दन मंची (पुणे)
आकाशकंदील विभाग
- प्रथम - रोहिणी सचिन चौधरी (सोलापूर)
- द्वितीय -रामेश्वर शिवकर्णीगुरव (सोलापूर)
- तृतीय -सोनाली निवृत्ती जाधव (अहमदनगर)
******************
यंदाच्या
नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुद्धा. हे
औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली आहे. मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी आणि मतदार
नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी
पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर
२०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी
कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच सर्व मतदार
नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे,
या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले
नागरिक मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतील.
स्पर्धेची नियमावली :
२. स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गूगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.
३. आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-
अ. आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.
आ. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.
इ. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
ई. फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
ऊ. आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.
ऊ. आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत- जास्त ३०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
ए. आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफीतीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
ऐ. आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
४. रांगोळी स्पर्धा :-
अ. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.
आ. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.
इ. फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.
ई. रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
५. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गूगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.
६. आपले फोटो आणि चित्रफीत खालील गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.
८. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
९. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसांचे स्वरूप
प्रत्येकी पुढीलप्रमाणे असेल :
- अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/
- ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-
- क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-
- ड. उत्तेजनार्थ :- १,००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
११. आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
१२. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.
१३. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS