Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations

SHARE:

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

या सुविधेनुसार विद्यार्थी 22 नोव्हेंबरपासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. इ. दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in  तर इ. बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर दि. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता

1) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र

2) आधारकार्ड

3) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे.

संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावी.

खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी.

विद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,370,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,635,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,531,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,785,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबर फॉर्म | Form No. 17 for 10th, 12th examinations
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्
https://www.mahahsscboard.in/mainbig.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtokZ-40eTqaR9XxrLyUpnRX-wi6ykA9Ryl_f8mp7MM29CgBH8GI9tfYhyTDhEG5pSer2rYs21SfLxd8dsGxe7hCnrxp5w_iIQplWCjAjq9-WSUARVS8iVaLFJZ-e4cRYUqtVzFfC-kYU/s72-c/FC8XXVYUYAI3PSD+%25281%2529.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2021/10/Form%20No-17-for-ssc-hsc-exam.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2021/10/Form%20No-17-for-ssc-hsc-exam.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS