Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22

SHARE:

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ State Level Innovation Competition Year 2021-22

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२
State Level Innovation Competition Year 2021-22

स्पर्धकांना आपले नवोपक्रम innovation.scertmaha.ac.in या लिंकवर सादर करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु सद्यस्थितीत दिवाळी सणानिमित्त सुट्टी असल्या राज्यभरातून बऱ्याच स्पर्धकांकडून नवोपक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याविषयी विनंती केली जा आहे. त्यामुळे स्पर्धकांना आपले नवोपक्रम सादर करण्यासाठी दि.२५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्या येत आहे. 

मुदतवाढ - राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.

  • ·        पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका) 
  •      प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक) 
  • ·        माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
  • ·        विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट
  • ·        अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे:

१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिका-यांना प्रोत्साहन देणे. 

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. 

३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिका-यांना उत्तेजन देणे.

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे. 

५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाइन प्रकाशित करणे.

 

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे. 

  1. नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे. 
  2.  नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. चा तपशील.
  3. नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
  4.  नवोपक्रमाचे नियोजन - ii) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा iii) आवश्यक साधनांचा विचार iv) करावयाच्या कृतींचा क्रम v) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण vi) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक) vi) उपक्रमासाठी इतरांची मदत viii) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे 

५) नवोक्रमाची कार्यपद्धती -

  • 1.       उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
  • 2.     पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
  • 3.     कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
  • 4.     उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी 
  • 5.     माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)
  • 6.     कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)-या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती विषद करावीत.

७) समारोप - आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे विशद करावे.

८) संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ.जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7_BjMmcx1Hc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. 

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ.६ वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील. 

२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA)/ DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

 

स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५. नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा. 

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२०-२१ किंवा २०२१-२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ५ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा. 

१०.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादेत नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल ५ MB पेक्षा जास्त नसावी.

१२.स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

१३.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अपलोड करावेत.

१४.जिल्हास्तर, विभाग स्तर व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१५.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिके व उत्तेजनार्थ बक्षीसपात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.

 

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,138,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,371,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,636,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,533,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,787,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,513,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,RTE admission,1,Scholarship,32,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ | State Level Innovation Competition Year 2021-22
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-1ksesJ8uIvZsa7KigGBtRvEQwW9rTQ9hsCckF3MuJ8wdL7JcnkEv0DU1luN40fPI_muFh7t7oOxeTmXh1IFY2DdkSn7RFlYbq_LZ5VRUR6pV7wmcVG_TfEehxADbVexlBaCdMvC5SLw/s16000/Screenshot_20211021-152732_Office.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-1ksesJ8uIvZsa7KigGBtRvEQwW9rTQ9hsCckF3MuJ8wdL7JcnkEv0DU1luN40fPI_muFh7t7oOxeTmXh1IFY2DdkSn7RFlYbq_LZ5VRUR6pV7wmcVG_TfEehxADbVexlBaCdMvC5SLw/s72-c/Screenshot_20211021-152732_Office.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2021/10/State-Level-Innovation-Competition.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2021/10/State-Level-Innovation-Competition.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS