⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टलवर नोंद करणे

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टलवर नोंद करणे Information on covid-19 preventive vaccination is recorded on the staff portal under the saral portal

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टलवर नोंद करणे

Information on covid-19 preventive vaccination is recorded on the staff portal under the saral portal

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी मागविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टल मध्ये केंद्र प्रमुख लॉगीनला देण्यात आली आहे.

खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इ. १ ली ते इ. १२ वी च्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक/ दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती केंद्र प्रमुख लॉगीनवरून स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून निर्देशित करावे.

१.१ केंद्र प्रमुख व शहरी भागात संबंधित अधिकाऱ्यांच्या लॉगीनला संबंधित केंद्रातील व भागातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती नोंदविण्याची व अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

१.२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक मात्रा/ दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावी. शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर याबाबतची संबंधित शाळेची माहिती सातत्याने अद्ययावत करण्यात यावी.

स्टाफ पोर्टल अंतर्गत केंद्र प्रमुखांच्या लॉगीनवरून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची प्रक्रीया खालीलप्रमाणे आहे.

  • ·        https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख, मनपा क्षेत्रात क्षेत्रिय अधिकारी व न.पा. क्षेत्रात प्रशासन अधिकारी यांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करावे.
  • ·        स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख म्हणून लॉगीन केल्यानंतर Vaccination या टॅब वरती क्लीक करावे. त्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल वर क्लीक करून ज्या शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवायची / अद्ययावत करावयाची आहे ती शाळा निवडण्यात यावी.
  • ·        उक्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मंजूर पदसंख्या नोंदवण्यात यावी. त्यानंतर उक्त शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदसंख्या नोंदवण्यात यावी.
  • ·        त्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या नोंदविण्यात यावी आणि त्यानंतर लसीकरणाची फक्त एक मात्रा पूर्ण झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या नोंदविण्यात यावी.
  • ·        वरीलप्रमाणे माहिती नोंदवून पूर्ण झाल्यानंतर उक्त माहिती योग्य असल्याची खात्री करून SAVE या बटनवर क्लीक करून माहिती अंतिम करावी.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम