⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

माध्य व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2022 | kala utsav 2022 registration

kala utsav,kala utsav drawing,kala utsav painting,kala utsav 2022 date,kala utsav meaning,kala utsav prize money,kala utsav 2022 drawing,kala utsav 2022,kala utsav composition,kala utsav liveमाध्य व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2022 आयोजन Kala Utsav 2022 for secondary and higher secondary level students
माध्य व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव 2022 आयोजन

Kala Utsav 2022 for secondary and higher secondary level students

सन २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२2- २3 मध्ये राज्याच्या ९ कला प्रकारांचे ९ संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाइन कला उत्सवासाठी १० डिसेंबर २०२2 पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

 

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • 1.       एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
  • 2.     सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
  • 3.     कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही,असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.

निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.

कला- उत्सव विविध क्षेत्रे

  • 1.       शास्त्रीय गायन
  • 2.     पारंपारिक गायन
  • 3.     शास्त्रीय संगीत वादन
  • 4.     पारंपारिक लोकसंगीत वादन
  • 5.     शास्त्रीय नृत्य
  • 6.     पारंपरिक लोकनृत्य
  • 7.      द्वीमितीय चित्र
  • 8.     त्रिमितीय चित्र
  • 9.     शिल्प व खेळणी


  • ·        व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व सोबत कला सादर करतानाचे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah2022 या हॅशटॅगचा वापर करून दि.20 ऑक्टोबर २०२2 संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा.
  • ·        पोस्ट Public असावी, ई- मेल पत्ता स्वत:चा नसेल तर पालक/शिक्षक यांचा ई -मेल वापरावा. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
  • ·      त्यानंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टल जाऊन करावी.
  • ·        नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी. ही नोंदणी करताना फेसबुक,इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी. एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी.
  • ·        आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
  • ·        एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे /पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
  • ·        विद्यार्थ्यांच्या /पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ·        #kalautsavmah2022 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.

 

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा

जिल्हास्तरावरून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट संघामधून राज्याच्या संघ निवडीसाठी प्राप्त नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल. राज्यस्तरीय सादरीकरणातून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील. राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना पुन्हा राज्यस्तरावर Online /प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागेल, याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळविली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबतही स्वतंत्रपणे कळविले जाईल. 

कला उत्सवासाठी कला क्षेत्रः

1. संगीत
2. नृत्य
3. थिएटर
4. व्हिज्युअल आर्ट्स (रेखाचित्र, चित्रकला, शिल्पकला, शिल्प)

कला उत्सवासाठी संघ: 

1. संगीत 6-10 विद्यार्थी
2. नृत्य 8-10 विद्यार्थी
3. थिएटर 8-12 विद्यार्थी
4. व्हिज्युअल आर्ट्स 4-6 विद्यार्थी

राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सवातील पुरस्कार:

  • प्रथम पारितोषिक रु. 25,000/- प्रत्येकी
  • द्वितीय पारितोषिक रु.20,000/- प्रत्येकी
  • तृतीय पारितोषिक प्रत्येकी रु.15,000/-

TAG- kala utsav,kala utsav drawing,kala utsav painting,kala utsav 2022 date,kala utsav meaning,kala utsav prize money,kala utsav 2022 drawing,kala utsav 2022,kala utsav composition,kala utsav live

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम