‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ ‘Ankanad State Level Reading and Satmikaran Competition Festival-3’
अंकनाद राज्यस्तरीय पाढे-पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा
पर्व-३ चे निकाल जाहीर
शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयात उत्तेजन देण्यासाठी, महाराष्ट्र
शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि MAAP
EPIC Communication Pvt.Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने अंकनाद
राज्यस्तरीय पाढे-पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित होते. स्पर्धेच्या पहिल्या
दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे तिसरे पर्व
यशस्वीत्यिा पार पडले. स्पर्धेचे दोन्ही टप्पे पार पडून अंतिम विजेते निवडले गेले
आहेत. पारितोषिक म्हणून प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि
तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि अनुक्रमे 11 हजार, 7 हजार, आणि 5 हजार रुपये किंमतीची भारतीय टपाल विभागाची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे दिली
जाणार आहेत.
या स्पर्धेमुळे स्पर्धकांमध्ये सभाधीटपणा वाढतो. सध्याच्या
स्पर्धेच्या युगात मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. स्पर्धेचे आयोजन दोन
टप्प्यात करण्यात येते. पहिल्या टप्प्यात स्पर्धकांनी आत्मसात केलेल्या पाढ्यांचे
सादरीकरण करणे आणि दुसऱ्या टप्प्या मुलाखतीच्या माध्यमातून आत्मसात केलेल्या
पाढ्यांचे दैनंदिन आयुष्यात उपयोजन कसे केले जाते, हे तपासून
स्पर्धकाचे अवलोकन केले जाते.
अंकनादतर्फे पाढे-पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण
महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हापातळी, राज्यपातळीवर स्पर्धा
घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाते. सर्व माध्यमांच्या
विद्यार्थ्यांना पाढे-पाठांतर स्पर्धा खुली असून विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून
शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होते. पाढे-पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील
सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे. वर्षातून दोनदा असे सातत्याने पाच वर्ष अशा
स्पर्धा आयोजित करणे प्रस्तावित आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे सध्यातरी ही स्पर्धा
ऑनलाइन स्वरुपात घेतली जात आहे.
स्पर्धा पर्व-3 ची सविस्तर माहिती
- मुदत-नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022
- नोंदणी करण्यासाठी मुदत-8 नोव्हेंबर 2021
ते 25 डिसेंबर 2021
- व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मुदत-25 नोव्हेंबर 2021 ते 10 जानेवारी
2022
- एकूण नोंदणी-1105,
- व्हिडिओ अपलोड-522
व्हिडीओचे जिल्हाश: आणि गटश: परीक्षण सुरु झाले आहे.
महाराष्ट्रातील 15 परीक्षकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांचे
परीक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे.
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात गटश: निकाल (राज्यस्तरावर
निवड झालेले स्पर्धक) जाहीर झाले. 153 स्पर्धक राज्यस्तरीय
परीक्षणासाठी निवडले गेले.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यस्तरीय
परीक्षण पूर्ण करुन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शासकीय कर्मचारी गटातून
कमी स्पर्धक निवडले गेले असल्याने खुल्या गटासोबत एकत्रित परीक्षण केले आणि दोन्ही
गटातून संयुक्तपणे तीन विजेते निवडले गेले.
गतवर्षीप्रमाणे मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयात पारितोषिक वितरण करण्याचा मॅप एपिक कम्युनिकेशन्य प्रा.लि. पुणे यांचा मानस आहे.
अंकनाद राज्यस्तरीय पाढे-पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा
पर्व-3 चे विजेते |
|||
बालगट आणि
पहिली |
|||
अ.क्र |
स्पर्धेचे
नाव |
बक्षीस |
जिल्हा |
1 |
आदित्य
रविकांत भोसले |
प्रथम |
सातारा |
2 |
निर्गुण
प्रशांत सदावर्ते |
द्वितीय |
बुलढाणा |
3 |
श्रीजा
संदेश झरेकर |
तृतीय |
अहमदनगर |
4 |
स्वजीत
अभिजित कुलकर्णी |
उत्तेजनार्थ |
पुणे |
दुसरी आणि
तिसरी |
|||
1 |
संचिता
संभाजी पाटील |
प्रथम |
सिंधुदुर्ग |
2 |
वेदिका
ओंकार ओक |
द्वितीय |
पुणे |
3 |
अंजुम
जमीर शेख |
तृतीय |
पुणे |
4 |
विराज
विवेकानंद खामकर |
उत्तेजनार्थ |
अहमदनगर |
चौथी आणि
पाचवी |
|||
1 |
विनया
नवनाथ जाधव |
प्रथम |
रत्नागिरी |
2 |
अथर्व
अमोद यावलकर |
द्वितीय |
पुणे |
3 |
संस्कृती
कुंडलीक पाटील |
तृतीय |
सांगली |
4 |
मुक्ता
संजय बापट |
उत्तेजनार्थ |
रत्नागिरी |
सहावी आणि
आठवी |
|||
1 |
दामोदर
धनंजय चौधरी |
प्रथम |
जळगाव |
2 |
प्रतिक
लक्ष्मीकांत लांजेवार |
द्वितीय |
पुणे |
3 |
सृष्टी
विशाल कुलकर्णी |
तृतीय |
जळगाव |
4 |
स्मृतिका
पांडुरंग ढवाण |
उत्तेजनार्थ |
पुणे |
आठवा, नववी आणि दहावी |
|||
1 |
यशाली
विनायक कदम |
प्रथम |
पुणे |
2 |
रणवीर
प्रवीण पवार |
द्वितीय |
कोल्हापूर |
खुला आणि
शासकीय कर्मचारी गट |
|||
1 |
विराज
विवेकानंद खामकर |
प्रथम |
अहमदनगर |
2 |
दामोदर
धनंजय चौधरी |
द्वितीय |
जळगाव |
3 |
श्रीमती
मनिषा हणमंत यादर |
तृतीय |
रायगड |
4 |
दिनेश
अनिल पवार |
उत्तेजनार्थ |
अहमदनगर |
‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’
‘Ankanad State Level Reading and Satmikaran Competition Festival-3’
महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास
संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-3 नावनोंदणी
सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक
कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा
उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व 3 साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 15 डिसेंबर पर्यंत
मुदत आहे. पाठ्यांचे व्हिडीओ 25 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.
मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य
शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या
नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून
मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे
पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद
तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली
जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना
पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी
स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील
विद्यार्थ्यासाठी आहे.
स्पर्धेचे नियोजन:
जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे
म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण
केले जाईल
राज्यपातळीवर :- परीक्षणानंतर गटनिहाय
यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून
तोंडी परीक्षण करण्यात येईल.
बक्षिसे:- व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व
स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना
प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात 19 हजार, 7 हजार, 5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार
आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य
जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.
स्पर्धेचा अभ्यासक्रम
- ·
बालगट (बयोगट 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100
- ·
दुसरी, तिसरी साठी 1 ते 10 पाढ़े, 11 से 20 पाढे, 21 ते 30 पाढे
- ·
चौथी पाचवी साठी पावकी, निमकी
- ·
सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,
- ·
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
- ·
खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी
पाऊणकी,
सवायकी, दिडकी, अडीचकी,
औटकी आणि एकोत्रे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS