राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी
भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक
सूचना
शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य,स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना
शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित
करणे :
- शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
- तापमापक (Thermometer), जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व
निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे. वापरण्यात
येणारे तापमापक हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
- ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतुक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता वाहतुकीसाठी वापरात येत असलेल्या वाहनांचे वेळो-वेळी निर्जंतुकीकरण करावे.
- एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) / कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतर करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे.
शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी :
- संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची RTPCR चाचणी करावी. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी
- ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी कोविड मुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. शाळेच्या
प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी
देण्यात यावी.
- ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक
सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी
त्वरीत चाचणी करावी.
- शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण ( दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश द्यावा.
बैठक व्यवस्था
- वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical
Distancing) च्या नियमांनुसार असावी.
- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यां दरम्यान ६ फुटांचे अंतर असावे.
- विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.
शारीरिक अंतर (Physical distancing) च्या
नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे
- शाळेत दर्शनी भागावर Physical distancing, मास्कचा
वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना प्रदर्शित कराव्यात.
- थुकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
- शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे
राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर (Physical distance) राखले
जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा
वापर गर्दी होणारी ठिकाणे, जसे पाणी पिण्याच्या सुविधा,
हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादीच्या
ठिकाणी करण्यात यावा.
- शारीरिक अंतर (Physical distance) राखण्यासाठी
जेथे शक्य असेल तेथे येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या
खुणा दर्शविण्यात याव्यात.
शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील निर्बंध
- परिपाठ, स्नेह संम्मेलन, व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा
कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक- पालक बैठका शक्यतो ऑनलाईन
घ्याव्यात.
पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची दक्षता
- शाळा विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी.
- आजारी असलेल्या किंवा लक्षण असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.
विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व
त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे:
- शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक,
शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता
शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक
घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुद्द्यांबाबत कार्यवाही करावी:
- वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण इत्यादीबाबत काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सुचना.
- शारीरिक अंतर पालनाचे (Physical distancing) चे
महत्व. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छताविषयक सवयी.
- कोविड-१९ बाबतच्या गैरसमजुती.
- कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे.
- मास्कचा वापर करावा.
- हात सातत्याने साबणाने स्वच्छ करावेत.
- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड१९ च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.
शाळेतील उपस्थितीबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे
- विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमती वर अवलंबून असेल.
- १००% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोविड-१९ परिस्थितीमुळे सद्य:परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करणे आवश्यक
- शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
- शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS