पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्क
शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा
शुल्कात वाढ
Increase in entrance fee and exam fee for scholarship
exam
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करण्यास मान्यता
सन २०१६-१७ या
शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या
शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व
शर्तीमध्ये दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार
बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु.२०/- करण्यास
तसेच परीक्षा शुल्क रु. ५०/- वरुन रु. ६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व
मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/-
करण्यास मान्यता देण्यात आली होती.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका
व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे
इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.आणि आज त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व
परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS