संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय
संविधान दिनाच्या निमित्ताने“माझे
संविधान,माझा अभिमान” उपक्रम
"My Constitution, My Pride" initiative on the occasion of
Constitution Day
२६ नोव्हेंबर
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व
समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या
मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक
आहे.भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि
भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण
आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे
संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,
२०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत
आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक
ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम
आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य
लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व
स्पर्धा,घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ.
अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा,
विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी,
विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान
दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात
यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची
माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधानिक
मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि
शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने
यांचे आयोजन करण्यात यावे.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या
उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ,फोटो
व इतर साहित्य समाजमाध्यमांवर (फेसबुक, ट्विटर,इंस्टाग्राम) #Constitutionday2021, #Constitutionweek2021,
#MyConstitutionMyPride या HASHTAG (#)चा वापर
करून आपल्या व्हिडीओ,फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड
करण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद आहेत, त्या
भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माध्यमातुन सहभागी व्हावे. सदर
कार्यक्रमांतर्गत समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आलेल्या पोस्टच्या नोंदी
करण्यासाठी ऑनलाईन लिंक आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठीच्या सविस्तर सुचना
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात
येतील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS