अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २०२१-२२ Pre-Matric Scholarship Scheme 2021-22 for students from minority commun
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजना २०२१-२२
Pre-Matric Scholarship Scheme 2021-22 for
students from minority communities
राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन,
बौद्ध, शीख, पारसी व जैन
या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती
योजना सन २००८-०९ पासून सुरु केली आहे.
चालू वर्षी NSP 2.0 पोर्टलवरती नवीन व नूतनीकरण
विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. १८/०८/२०२१ पासून सुरु झाली आहे.
क्षेत्रिय कार्यालयास दि. २६/०८/२०२१ पत्रान्वये अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात
आलेल्या आहेत.
- ·
नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज
ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख
१५ नोव्हेंबर,30 नोव्हेंबर15 डिसेंबर २०२१ - ·
शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख
१५ डिसेंबर,31 डिसेंबर२०२१ - ·
जिल्हा स्तरावरा अर्ज पडताळणीची अंतिम
तारीख
३१ डिसेंबर, १५ जानेवारी २०२2
अटी व शर्ती
- 1. इयत्ता १ ली ते १० वीच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/निमशासकीय/खाजगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे.
- 2. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५० टक्के पेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा. (केंद्रशासनाने कोव्हिड-१९ च्या प्रार्दुभावामूळे ही अट चालू वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे.)
- 3. पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.
- 4. पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील २ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- 5.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक
माहिती,
शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक
भरावी. धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
गुणपत्रक, आधारकार्ड/आधार नोंदणी पावती,
विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या
पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावीत.
- 6. ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तींचा लाभ घेतलेला नसावा.
- 7. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखीव आहे.
- 8. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतीगृहात राहत असतील अथवा राज्यशासनाच्या वसतीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेले शुल्काचा पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.
शाळेच्या सूचना
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे वर्ग निहाय व वर्ष निहाय किमान ५ वर्ष जतन करुन ठेवणे.
- ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेस शासनाची मान्यता आहे परंतू वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठही अर्ज स्वीकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज रिजेक्ट किंवा फेक मार्क करावे.
- शाळा स्तरावरुन विद्यार्थ्यांचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चूकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करण्यात यावा.
- शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार
माहिती NSP
2.0 या पोर्टलवरती भरण्यात यावी.
- सन २०१५-१६ पासून शिष्यवृत्तीचे वितरण केंद्रशासनामार्फत
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT(Direct Beneficiary Transfer) Mode द्वारे
करण्यात येत आहे.
सूचना
- · सन २०२०-२१ मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
- · नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन/नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.
- ·
विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत
बँकेचे असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती
अर्जात भरता येईल.
- ·
इयत्ता १ ली ते १० वी मधील
विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी
संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. (टीप :- हे अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in
या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.)
- · अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो ०२ पाल्यांसाठीच वापरता येईल.
- ·
इ. १ली ते १०वी मधील विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती रक्कम रुपये १,०००/-
ते १०,०००/- शासनाद्वारे दिली जाईल. अधिक माहितीसाठी
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयास संपर्क करावा.
Tag-pre-matric scholarship scheme,pre-matric scholarship
scheme for st students,pre-matric scholarship scheme for sc students (9th &10th) css,pre-matric scholarship
scheme. to apply online click here,pre-matric scholarship scheme for students
studying from class 1st to class 10th,pre
matric scholarship schemes minorities cs,pre matric scholarship scheme upsc,pre
matric scholarship scheme for class 1 to 10,pre
matric scholarship scheme for minorities 2019-20,pre
matric scholarship scheme 2021-22
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS