भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन
Organizing "Ganitotsava" on the occasion of
National Mathematics Day under "Nipun Bharat Abhiyan"
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर
जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय
स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन
विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक
स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास
सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य पातळीवर
"निपुण भारत अभियान” सुरु करण्यात आले आहे. या अभियान
अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN) विकसित व्हावे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
“निपुण भारत अभियान” अंतर्गत
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या
कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व
व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या गणितोत्सव” ची प्रमुख संकल्पना (Theme) “पायाभूत संख्याज्ञान”
(FLN-foundational Numeracy) ही निश्चित करण्यात येत आहे.
गणितोत्सव"अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
सदर नियोजन करत असताना विद्यार्थी,शाळा,शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा
सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.दिवस निहाय खालीप्रमाणे उपक्रमांचे आयोजन
करण्यात यावे.
ब) पोस्टर निर्मिती उपक्रम
विद्यार्थ्यांना गणितीय संबोध तसेच गणिताची गोडी विकसित
व्हावी याकरिता चालना देण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) संकल्पनेवर आधारित सर्जनशील व नाविन्यपूर्ण पोस्टर निर्मिती करणे अपेक्षित
आहे.सदर पोस्टर मधून उत्कृष्ट पोस्टर/संकल्पना शाळेमध्ये छपाई समृद्ध वातावरण (Print
Rich Environment) निर्मिती करण्याकरिता निवडले जाणार आहेत.याकरिता
पोस्टर निर्मितीकर्त्याची सहमती असणे आवश्यक आहे.निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट
पोस्टर निर्मितीकर्त्यास राज्यस्तरावरून प्रमाणपत्र देण्यात येईल.राज्यातील शिक्षक,अधिकारी,गणित प्रेमी व शिक्षण तज्ञ यांनी पोस्टर
निर्मिती उपक्रमांतर्गत सक्रीय सहभाग घ्यावा.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या
उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ,फोटो
व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर इंस्टाग्राम,फेसबुक,
#Mathematicsday2021, #Ganitotsav2021, #Nipunbharatabhiyan #FLN या
HASHTAG (#)चा वापर करून आपल्या व्हिडीओ,फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी.
आपण अपलोड केलेल्या पोस्ट ची लिंक https://scertmaha.ac.in/mathematicsday
या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून
प्रसिद्धी देण्यात येईल.
सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS