निवडश्रेणी संदर्भातील माहिती पात्रता व निकष निवडश्रेणीसाठी प्राथमिक,माध्यमिक,विशेष शिक्षकांच्या अर्हता,अनुभव, पात्रता
निवडश्रेणी संदर्भातील माहिती पात्रता व निकष
निवडश्रेणीसाठी शिक्षकांच्या अर्हता ,अनुभव,
पात्रता
संदर्भ-
- शासन निर्णय 2 सप्टेंबर 1989,
- शासन निर्णय 1 डिसेंबर 1999,
- शासन निर्णय 29 जून 2002,
- शासन निर्णय 15 जुलै 2016
वरिष्ठ \ निवड श्रेणीचे शासन
निर्णय GR
राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता
1) प्राथमिक
शिक्षक (वर्ग 1 ते 8 ,D.Ed पात्रता
धारक) :- पदवी प्राप्त करणे आवश्यक (B.A, B.Com,B.Sc), 12
वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठवेतनश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा
2) माध्यमिक शिक्षक (वर्ग 9, 10 वि B.Ed. पात्रता):- वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा,पदवीधर शिक्षकांनी पदव्यूत्तर पदवी करणे आवश्यक आहे.
उदा-
अ) B.A B.Ed धारकांनी M.A/M.Ed/M.A(Edu)
ब) B.Com B.Ed धारकांनी M.Com/M.Ed/M.A(Edu)
क) B.Sc B.Ed धारकांनी M.Sc
/M.Ed/M.A(Edu)
टीप - ज्या
शिक्षकांना अध्यापनाच्या विषयांची पदव्यूत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता
बहिस्थ:रित्या संपादन करता येत नाही त्या ठिकाणी M.Ed /M.A शिक्षणशास्त्र ( Edu
) ही पदवी ग्राह्य धरण्यात
येते (शासन निर्णय 15 जुलै 2016)
टीप - B.Sc B.Ed (Bio किंवा Math) यांनी इतर विषयात इतिहास,मराठी,समाजशास्त्र इ. MA केले असेल
तर ग्राह्य धरले जात नाही.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठीनाव नोंदणी
3)उच्च माध्यमिक शिक्षक :- (11,12 वी)
उच्च माध्यमिक शिक्ष( M.A B.Ed/ M.Sc B.Ed/M.Com B.Ed) उच्च
माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठवेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा, M.Phil /
P.hd / M.Ed /संगणकातील पदव्युतर पदवी MS - ACITIT इ अर्हता आवश्यक राहील.
4) विशेष शिक्षक
:-
अ) शारीरिक शिक्षक :- SSC, HSC व एक वर्षे शारीरिक शिक्षण
अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारकांना
B.P.Ed ही अर्हता तर B.P.Ed धारकांनी M.P.Ed
ही अर्हता प्राप्त करावी.
ब) हिंदी शिक्षक :-
SSC,HSC
धारकांनी संबधित विषयातील पदवी अथवा समकक्ष व पदवी धारकांनी संबंधित पदव्युत्तर वा समकक्ष
अर्हता धारण करावी.
क) संगीत शिक्षक :-
मॅट्रिक/SSC
असलेल्या संगीत विशारद
शिक्षकांनी संबंधित विषयातील पदवी तर पदवीधर
शिक्षकांनी
संबंधित विषयातील पदव्युत्तर अर्हता धारण
करावी.
ड) चित्रकला शिक्षक
:- DTC
किंवा DMC किंवा ATD अशी
अर्हता धारण करणाऱ्यानी आर्ट मास्टर (AM) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी( रेखा/रंगकला/उपयोजित कला/
शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील आर्ट मास्टर प्रमाणपत्र पदवी (AM) किंवा कला शिक्षणशास्त्र पदविका (D.Ed.) अशी अर्हता धारण
करावी.
अध्यापक विद्यालय-अध्यापक विद्यालय त शिक्षकांची नेमणूक M.A/M.Sc, M.Ed ही आहे त्यामुळे वेगळी डिग्री घेण्याची आवश्यकता नाही.वरिष्ठ वेतनश्रेणी
ही कालबध्द वेतनश्रेणी आहे,
टीप- D.ed पात्रता धारक जे शिक्षक माध्यमिक शाळेत 5 ते 7 वर प्रथम नियुक्ती झालेली आहे त्यात 12 वर्षा नंतर
वरीष्ठवेतनश्रेणी मिळाली आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक (25%) म्हणून
नियुक्ती झाली असेल व 12 वर्षे झाले असेल तर निवडश्रेणीस
पात्र नाही कारण वेतनश्रेणीत बदल झाला त्यामळे त्याना पदवीधर शिक्षकाची
वरीष्ठवेतनश्रेणी मिळेल.
एक बाब लक्षात ठेवा एकाच वेतनश्रेणीमध्ये 12
वर्षे झाले तरच वरीष्ठवेतनश्रेणी व 24 वर्षे सेवा झाली असेल तरच निवडश्रेणी निवडश्रेणी संवर्गातील
वरीष्ठवेतनश्रेणी मधील सेवाजेष्ठता नुसार 20 % पदांना मिळते
सरसकट मिळत नाही तर माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना द्विस्तरीय वेतनश्रेणी
आहे त्यांना निवडश्रेणी देय नाही.
वरिष्ठ \ निवड श्रेणीचे शासन
निर्णय GR
सदर माहितीमध्ये काही बदल असू शकतो तरी तो बदल तज्ञ शिक्षकांनी निदर्शनात आणून द्यावे.वरील पोस्ट शिक्षकांना माहितीत्व उपलब्ध करून देत आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS