⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील सर्व शाळांमध्ये "जिजाऊ ते सावित्रीसन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान

राज्यातील सर्व शाळांमध्ये "जिजाऊ ते सावित्रीसन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान  "Jijau to Savitrisanman Maharashtra's Lekincha" campaign in all schools in the state

राज्यातील सर्व शाळांमध्ये "जिजाऊ ते सावित्रीसन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान

"Jijau to Savitrisanman Maharashtra's Lekincha" campaign in all schools in the state

राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधी दरम्यान "जिजाऊ ते सावित्रीसन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

असंख्य अडचणींवर मात करून स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योध्दा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि.०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.



विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ,फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #balikadivas2022, #mahilashikshandin2022, #misavitri2022, #mijijau2022या HASHTAG (#)चा वापर करून आपल्या व्हिडीओ,फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम