Maharashtra Education Board timetable announcement: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
10th-12th board exam timetable announced
Maharashtra Education Board timetable announcement: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी
होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक १६ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर
केले. त्यावर शालेय शिक्षण विभागाने (School education department)शिक्कामोर्तब केल्याची माहिती देण्यात आली.
संपूर्ण वेळापत्रक खाली दिले आहे.
दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न
परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व
सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण
विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
२०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५ % पाठ्यक्रम
कमी | सर्व PDF Update
विषयानुसार इ नववी ते दहावी २५% कमी केलेला अभ्यासक्रम PDF
दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022
बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022
या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी
व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत
आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील.
तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९
एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व
अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या
कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या
पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी
व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत
आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत
होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन
परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात
येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा
५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल
अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
10th 12th board exam time table,10th 12th board exam time
table 2021,10th 12th board exam date 2021,10th 12th board exam date 2021
rbse,10th 12th board exam time table 2021,10th and 12th board exam 2021 date
sheet,10th 12th exam date 2021 maharashtra board
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
It's very Useful
उत्तर द्याहटवा