⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे | National Voters Day

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दरवर्षी दिनांक २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे

To celebrate National Voters Day on 25th January every year in schools and junior colleges

दि.२५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात -राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते.

सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये (इयत्ता नववी आणि दहावी) आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात यावा.

सदर दिवशी पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

  • ·      शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार शाळेत (इयत्ता नववी व दहावी) आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळ या व्यासपीठांतर्गत सदर दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात याव्यात. उदा. निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, भित्तिपत्रक (पोस्टर), रील (एक मिनिटांचे व्हिडिओ), मीम, गाणे, विडंबन काव्य, घोषवाक्य इ. स्पर्धा.

स्पर्धांसाठी विविध विषयांची यादी पुढीलप्रमाणे :

  1. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी - मतदार नोंदणी
  2. वर्गप्रमुख पदाची निवडणूक मी अशी लढवणार...
  3. मी आमदार झालो/ झाले तर...
  4. माझा नगरसेवक/सरपंच असा हवा...
  5. मी नगरसेवक/सरपंच झालो / झाले तर...
  6. माझा आमदार असा हवा...
  7. मी खासदार झालो/ झाले तर
  8. माझा खासदार असा हवा….
  9. एका बोटावरच्या शाईची किंमत?
  10. मी मताधिकार बजावणार कारण.
  11. अठराव्या वर्षाची जबाबदारी..

  • ·        मताधिकार, लोकशाही यासंबंधी परिसंवाद, व्याख्यान यांचे आयोजन करावे.
  • ·        विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा. (मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शपथेचा नमुना सोबत जोडलेल्या परिशिष्ट २ मध्ये देण्यात आलेला आहे.)


राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञा

national voters day pledge,national voters day pledge 2021,national voters day pledge in hindi,national voters day pledge in english,elaborate on national voters day pledge


 

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम