⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Cowin App वर नोंदणी | See how to register

1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Cowin अॅपवर नोंदणी सुरु..बघा कशी करायची नोंदणी  From January 1, children between the ages of 15 and 18 started registering on the Cowin app. See how to register.

1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Cowin App वर नोंदणी सुरु..बघा कशी करायची नोंदणी

From January 1, children between the ages of 15 and 18 started registering on the Cowin app. See how to register.

3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून नोंदणी करता येईल. नोंदणी साठी आपण Cowin App चा वापर करू शकतो अशी माहिती देण्यात आलेली आहे.

नोंदणीसाठी 10 वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नाही.

लस नोंदणी प्रक्रिया | Vaccine registration process

  • ·        Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
  • ·        आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
  • ·        आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
  • ·        सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
  • ·        आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
  • ·        लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रिफ्रेन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.
  • ·        त्याचप्रमाणे, आपण आपल्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

सध्या देशात 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लस मंजूर करण्यात आली आहे. त्या वयाखालील बालकांच्या लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कशी असेल कोविन सुविधा?

  • ज्या मुलांचं वय हे १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तसेच ज्यांचं जन्म वर्ष २००७ किंवा त्यापूर्वीचं असेल ते सर्व लस घेण्यात पात्र असून त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.
  • कोविनवरील सध्याच्या अकाऊंटवरुन किंवा नव्यानं अकाउंट तयार करुन या लाभार्थ्यांना नोंदणी करता येईल. यासाठी त्यांना युनिक मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सध्याच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.
  • या लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोडद्वारे नोंदणी करता येईल.
  • लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट (वॉकइन) नोंदणी करता येणार आहे.
  • १५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लसंच देण्यात येणार आहे. कारण याच लसीला सध्या परवानगी देण्यात आली आहे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम