जलसुरक्षा,जलसुरक्षा प्रकल्प मराठी,जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती,जलसुरक्षा 10 वी pdf,जलसुरक्षा इयत्ता दहावी कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही),ज
इ.10 वी जलसुरक्षा या अनिवार्य श्रेणी
विषयाची मुल्यमापन योजना
१०th Assessment Scheme for Compulsory Category of Jal
Surksha
इयत्ता १० वी
जलसुरक्षा मूल्यमापन योजना
जलसुरक्षा हा विषय इयत्ता १० वी साठी अनिवार्य श्रेणी विषरा
म्हणून निर्धारित करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व
कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे.
त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा रागावेश करण्यात आलेला आहे. तर
कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व
कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना
आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प
यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली
आहे.
१. सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी
कराव्यात.
२. उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन भंडळाने निर्धारित केलेली
जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा
करून घ्यावी.
3.उपरोक्तप्रमाणे एकूण १०० गुणांपैकी प्राप्त गुणांचे
श्रेणीत रुपांतर करण्यात येईल.
४. अ, ब, क श्रेणी
उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल.
(अ श्रेणी -- ६० ते १०० गुण, ब श्रेणी - ४५ ते
५९ गुण, क श्रेणी - ३५ ते ४४ गुण, ड
श्रेणी- 6 ते ३४ गुण)
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS