Colleges in the state closed till February 15राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद
राज्यातील महाविद्यालये 15
फेब्रुवारी पर्यंत बंद | Colleges in the state closed till February 15
कोविड १९ आणि ओमायक्रॉन वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील
सर्व प्रकारची विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी
संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत फक्त ऑनलाईन
पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंत यांनी केली.
सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये 15
फेब्रुवारीपर्यंत बंद
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालये १५
फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील परीक्षा १५
फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. हा
निर्णय सर्व खासगी विद्यापीठांनाही लागू होणार आहे.
हा निर्णय राज्यातील केवळ अकृषी विद्यापीठांनाच नाही तर इतर
खासगी विद्यापीठांनाही लागू होणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षा
घेण्याचे मान्य केले आहे. परीक्षांमध्ये अडचण आल्यास महाविद्यालये आणि
विद्यापीठांना हेल्पलाइन क्रमांक प्रदान करण्याचा सल्ला दिला जातो. कॉलेजसह
वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातून तसेच इतर राज्यातून
संशोधनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश
देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
या कालावधीत शिक्षण ऑनलाइन पद्धतीने परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार
शिक्षकांना 50 टक्के वर्क फ्रॉम होम असणार.
सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS