⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुले | त्यांचे मराठी हस्ताक्षर

सावित्रीबाई फुले भाषण मराठी,सावित्रीबाई फुले भाषण मराठीत,सावित्रीबाई फुले भाषण मराठी शायरी,सावित्रीबाई फुले भाषण मराठी माहिती,सावित्रीबाई फुले भाषण हिंदी,सावित्रीबाई फुले जयंती भाषण हिंदी,सावित्रीबाई फुले हिंदी मे भाषण,सावित्रीबाई फुले भाषण इन मराठी,सावित्रीबाई फुले भाषण english

शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुले

Education Empress Savitribai Phule

३ जानेवारी हा स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. आजच्या भारतात स्त्रियांच्या शक्षणाचे प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आजची स्त्री घराबाहेर पडून जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने भूमिका पार पाडत आहेत. परंतु त्याची सुरुवात १८४८ साली पुण्यात सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेने झाली. त्यात ज्योतिरावांबरोबर सावित्रीबाईंचा वाटा महत्त्वाचा होता.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्यातील नायगाव येथे झाला. खंडोजी नेवसे पाटील हे त्यांचे वडील. लहानपणीच्या त्यांच्या वर्तनात मुत्सद्दीपणा, धीटपणा, व्यवहारकुशलता, निर्भयता या गुणांची प्रचिती येत होती. त्यांचा विवाह बालवयातच, म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी १८४० च्या फाल्गुन वद्य पंचमीला झाला.

फुले घराण्याच्या या गृहलक्ष्मीने त्यांच्या सासऱ्याच्या गोविंदरावांच्या आग्रहानुसार ज्योतिबांबरोबर शेती करण्यात सुरुवात केली. शेतातल्या कामाच्या वेळी दुपारी विश्रांतीच्या वेळी ज्योतीबांनी शिक्षणाची गंगा सावित्रीबाईंपर्यंत पोहचविली. सावित्रीबाईंची निरिक्षरता नष्ट होऊन त्या साक्षर झाल्या. सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्त्व ज्ञानाच्या सहवासाने पूर्णांशाने विकसित झाले.त्या शिक्षणाच्या कार्यात ज्योतिरावांना सहकार्य करू लागल्या. सावित्रीबाईंच्या बाबतीत शिक्षणाचा अभिनव उपक्रम यशस्वी झाल्याने ज्योतिबांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली.

सावित्रीबाईंचे मराठी हस्ताक्षर 

सावित्रीबाई फुले मराठी हस्ताक्षर

सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या कार्यात त्यांना सगुणाबाई क्षीरसागरांची साथ मिळाली. त्या दोघी नुसत्या अक्षरज्ञान प्राप्त करण्यावर थांबल्या नाहीत, तर त्यांनी मिसेस मिचेल यांच्या मार्णन ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचे ट्रेनिंग घेतले होते. त्यानंतर त्या शिक्षिका झाल्या. आजूबाजूला असलेली सामाजिक परिस्थिती शूद्र, अतिशूद्रांचे हाल, स्त्रियांची समाजातील दैन्यावस्था, अवहेलना, त्यांना असणारे नगण्य स्थान या गोष्टींनी सावित्रीबाई अस्वस्थ झाल्या. ज्योतिबांच्या सहकार्याने समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रीय सहभागी झाल्या.

दि.३ ऑगस्ट, १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहली शाळा फुले पती - पत्नींनी सुरू केली. सहा मुलींसह सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्यास सुरुवात केली. त्या शाळेत जात असताना त्यांना समाजकंटकांच्या नको त्या बोलण्याचा, शेणमातीचा, दगडांचा मार सहन करावा लागला. परंतु त्यांनी स्त्री शक्षणाच्या आपल्या कार्याची वाटचाल पुढे चालू ठेवली. इ.स. १८४८ ते १८५२ या कालावधीत महात्मा फुले व सावित्रीबाईंनी १८ शाळा काढल्या. त्यांचे शक्षणाचे कार्य अधिक जो माने सुरू राहिले . एकोणीसाव्या शतकातील एक उत्तम मुख्याध्यापिका म्हणून सरकारने ही त्यांचा गौरव केला होता.


शिक्षण सम्राज्ञी सावित्रीबाई फुले स्पर्धा

१९ व्या शतकातील बालविधवांच्या बाबतीत रूढ असलेली के शवपनाची प्रथा अमानवी असल्याच्या भावनेतून ज्योतिबांनी त्याविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनात तर त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. २८ जानेवारी, १८६३ मध्ये ज्योतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने 'बालहत्या प्रतिबंधक गृहा' ची स्थापना आपल्या राहत्या घरी केली. या गृहात त्यांनी दाईपण स्वीकारून अनेक विधवा स्त्रियांची सुटका करून त्यांच्या मुलांचा सांभाळ केला. काशीबाई या विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेऊन पुत्रवत प्रेम दले. यशवंतला डॉक्टर केले. रूढी परंपरेच्या चाकोरीत वाटचाल करणाऱ्या समाजाचे अंग असूनही त्या समाजात मोठ्या धैर्याने अनाथांच्या माऊली झाल्या.

सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्याप्रमाणे एक प्रतिभासंपन्न साहत्यिक होत्या. सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ मध्ये प्रसिद्ध झाला, तो म्हणजे 'काव्यफुले'. या संग्रहात त्यांनी प्रारंभी शंकराचे स्तोत्र लिहिले. त्यानंतर आपले जन्मगाव, निसर्गसौंदर्य वर्णन करणाऱ्या कविता लिहिल्या. त्यांच्या कवितेतील रचना आणि भावसौंदर्य प्रस्थापित कवीच्या तोडीचे आहे .निसर्गसौंदर्य वर्णनाबरोबरच त्यांच्या लिखाणात शूद्रातिशूद्रांचे जीवन आणि स्त्रियांची अवहेलना, अन्याय यांचे प्रभावी व मार्मिक चित्रण आढळते.

'विचारप्रवर्तक संबंध' हा निबंधसंग्रहही त्यांच्या साहित्यिक कार्याचाच एक भाग होय. काव्यलेखन, संबंधलेखन, पत्रलेखन, गद्यरचना यांसारख्या विविध साहित्यप्रकारांतून सावित्रीबाईंच्या प्रतिभेची प्रचिती येते.

राज्यातील सर्व शाळांमध्ये "जिजाऊ ते सावित्रीसन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान

ज्योतिबांच्या मृत्यूनंतर १८९७ मध्ये महाराष्ट्रात प्लेगची साथ सुरू झाली व त्याच्या साथीने शेकडो माणसे मृत्यूमुखी पडण्यास सुरुवात झाली होती. जनसामान्यांना वाचवण्यासाठी सावित्रीबाई पुढे झाल्या. सावित्रीबाई प्लेग झालेल्या अनाथ बालकांना वाचण्यासाठी झटत असत. त्यांना प्लेगचा प्रादुर्भाव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू १० मार्च, १८९७ रोजी झाला.

सावित्रीबाई त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याच्या रूपाने आजही अमर आहेत. अत्यंत धीरोदात्तपणे स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंनी स्वत: सामाजिक छळ सोसून क्रांतीचे पहले पाऊल उचलले.

 

TAG-सावित्रीबाई फुले भाषण मराठी,सावित्रीबाई फुले भाषण मराठीत,सावित्रीबाई फुले भाषण मराठी शायरी,सावित्रीबाई फुले भाषण मराठी माहिती,सावित्रीबाई फुले भाषण हिंदी,सावित्रीबाई फुले जयंती भाषण हिंदी,सावित्रीबाई फुले हिंदी मे भाषण,सावित्रीबाई फुले भाषण इन मराठी,सावित्रीबाई फुले भाषण english

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम