⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

“परीक्षा पे चर्चा-५" या कार्यक्रमांतर्गत नोंदणी आणि सर्जनशील लेखन स्पर्धा आयोजन | Pariksha Pe Charcha-5 Reg

Organizing registration and creative writing competition under the program "Pariksha Pe Charcha-5"

परीक्षा पे चर्चा-५" या कार्यक्रमांतर्गत नोंदणी आणि सर्जनशील लेखन स्पर्धा आयोजन

Organizing registration and creative writing competition under the program "Pariksha Pe Charcha-5"

 परीक्षा पे चर्चा-५" या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९वी ते १२ वी मधील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमाद्वारे (Virtual Mode) फेब्रुवारी २०२२ मध्ये संवाद साधणार आहेत.

परीक्षा पे चर्चा -५" या कार्यक्रमातील सहभागासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी मधील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसाठी नाव नोंदणी व सर्जनशील लेखन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सहभागी होण्यासाठी दिनांक २८/१२/२०२१ ते दिनांक २०/०१/२०२२ या कालावधीत https://www.mygov.in/ या वेबसाईटवर किंवा https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ या वेबसाईटवर नोंदणी करता येईल. नाव नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना खाली दिलेल्या विषयावर आधारित १५०० अक्षर मर्यादेपर्यंत ऑनलाईन सर्जनशील लेखन स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल.

विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात या ५०० अक्षर मर्यादेपर्यंत प्रश्न तयार करून https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ पोर्टलवर लिहून विचारता येतील. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचे मार्फत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या पोर्टलवरील प्राप्त प्रश्नावरून काही निवडक प्रश्न परीक्षा पे चर्चा-५या कार्यक्रमांतर्गत घेतले जातील.

ऑनलाईन सर्जनशील लेखन स्पर्धेमध्ये भारतातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मिळून २०५० विजेते निवडण्यात येणार आहेत. यातील महाराष्ट्रातून शिक्षक, पालक व विद्यार्थी मिळून २०२ विजेते निवडण्यात येणार आहेत. विजेत्यांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीपीसी कीट (परीक्षा पे चर्चा किट) देखील मिळणार आहे, ज्यामध्ये मा. पंतप्रधान यांनी लिहिलेल्या हिंदी व इंग्रजी मधील परीक्षा योद्धा (Exam Warriors) या पुस्तकाचा समावेश असणार आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ संलग्न शाळा, व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न (CBSE, ICSE, Cambridge, इत्यादी) शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना जास्तीत जास्त सहभाग नोंदविणे.

 

ऑनलाईन सर्जनशील लेखन स्पर्धा खालील विषयांवर आयोजित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यासाठी विषय :

१. कोविड-१९ दरम्यान परीक्षेचा ताण व्यवस्थापन कार्यनीती:

कोरोना महामारीच्या कालावधीत विद्यार्थी म्हणून तुम्ही समायोजन साधण्यासाठी स्वत: मध्ये कोणते बदल करून घेतले व परीक्षेची तयारी कशी करत आहात व आगामी परीक्षेच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या कार्यनीतीनांचा अवलंब करणार आहात, याबाबत लिहा.

२. आझादी का अमृत महोत्सव:

विद्यार्थ्यानो आपण राहत असलेल्या गावाचा/नगराचा /शहराचा इतिहास माहिती आहे काय? तुमच्या गाव/नगर/शहराच्या संदर्भात स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाबाबतच्या अज्ञात पैलूविषयी माहिती लिहा.

३. आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर शाळा:

कोविड-१९ महामारीमुळे शाळा पूर्णपणे कार्यरत नसताना अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी तुम्ही स्वत:ला व आपल्या शिक्षकांना आत्मनिर्भर बनविण्याविषयी तुमच्या कल्पना लिहा.

४. स्वच्छ भारत, हरित भारतः

हवामान बदलाविरुद्ध भारताच्या लढ्याला बळकटी कशी द्यावी? याविषयी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पना लिहाव्यात.

५. वर्गातील डिजिटल साधनांचा सहयोगः

कोविड-१९ कालावधीत शिक्षकांनी तुमचा ऑनलाईन वर्ग कसा आनंदी, मनोरंजक आणि प्रभावी बनवला. तसेच ऑनलाईन वर्गांची गुणवत्ता कशी सुधारली जाऊ शकते, यावर तुमची मते लिहा.

६. पर्यावरण संवर्धन आणि वातावरण बदलाशी तादात्म्य :

कोविड-१९ महामारीच्या काळात विद्यार्थी म्हणून पर्यावरण संवर्धन व वातावरण बदलाशी तादात्म्य साधण्यासाठी राबविलेले उपक्रम/कृती विषयी लिहा.

 

शिक्षकांसाठी विषय :

१. नवीन भारतासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-२०२०):

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला व समाजाला कशा प्रकारे सक्षम बनवतील, या अनुषंगाने "नया भारत" साठी लेखन करा.

२. कोविड-१९ महामारी: संधी आणि आव्हाने:

कोविड-१९ महामारीच्या काळात शिक्षकांना आलेल्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने अध्ययन-अध्यापनात केलेल्या/ अवलंबलेल्या सुधारणा/कार्यनीती लिहा.


पालकांसाठी विषय :

१. बेटी पढाओ, देश बढाओ

"बेटी बचाओ, बेटी पढाओ" च्या यशस्वी अंमलबजावणीची सात वर्षे देश साजरी करत आहे. माननीय पंतप्रधानांच्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या उपक्रमाची राष्ट्रीय विकासात कशी मदत झाली आहे, याबाबत सर्जनशील लेखन करणे.

२. लोकल टू ग्लोबल - लोकल फॉर व्होकल:

"भारताला लोकल टू ग्लोबल व लोकल फॉर व्होकल बनवण्यासाठी काय कराल? याबाबत लेखन करणे.

३. विद्यार्थ्यांची आजीवन शिकण्याची तळमळ:

कोविड-१९ कालावधीत पालकाने मुलांकडून शिकलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल लेखन करणे.


शाळांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कार्यक्रमासंदर्भात स्वतःचे पोस्टर्स, नवनिर्मिती (creatives)/व्हिडीओ #PPC2022 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट करावेत. यामधून निवडक पोस्टर्स, नवनिर्मिती (creatives)/व्हिडीओ MyGov या पोर्टलवर प्रदर्शित केले जातील. ज्या सहभागींची परीक्षा पे चर्चा - ५या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येईल, त्या सहभागींची यादी यथावकाश कळविण्यात येईल.


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • प्रा.दिपक अंबरते शिवाजी नगर साई नगर जवळ अमरावती
    प्रा.दिपक अंबरते शिवाजी नगर साई नगर जवळ अमरावती १ जानेवारी, २०२२ रोजी ७:१९ PM

    छान माहीती मिळाली धन्यवाद

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम